आणीबाणीला विरोध करणाऱ्यांचे पंतप्रधानांनी केले स्मरण

भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आपल्या राज्यघटनेतल्या मूल्यांचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी कटीबद्ध होऊया – पंतप्रधान

नवी दिल्ली,२५जून /प्रतिनिधी :-  आणीबाणीला विरोध करत भारतीय लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या सर्व महान व्यक्तींचे स्मरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

1975 मध्ये याच दिवशी लागू झालेल्या आणीबाणीनिमित्त केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे,
‘#DarkDaysOfEmergency , आणीबाणीच्या काळ्याकुट्ट कालखंडाचा कधीच विसर पडू शकत नाही. 1975 ते 1977 हा कालखंड संस्थांच्या विनाशाचा साक्षीदार आहे.

भारतीय लोकशाहीची भावना बळकट करण्यासाठी आणि आपल्या राज्यघटनेतल्या मूल्यांचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी कटीबद्ध होऊ या.

कॉंग्रेसने अशा प्रकारे लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली. ज्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण केले अशा सर्व थोरांचे स्मरण करत आहोत. #DarkDaysOfEmergency’