राज्यात आज ११ हजार ७६६ नवे करोनाबाधित,सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या मोठी

मुंबई ,११ जून /प्रतिनिधी:-  अनलॉक झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांची आकडेवारी पाहिली तर राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे.गेल्या दोन दिवसांपासून त्यामध्ये काहीशी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात ११ हजार ७६६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५८ लाख ८७ हजार ८५३ झाली आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ४०६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण काही दिवसांपूर्वीपर्यंत २५०च्याही खाली गेलं होतं.

आज दिवसभरात राज्यात ८ हजार १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त दिसत होता. आज मात्र, नव्या करोनाबाधितांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं आहे. आत्तापर्यंत राज्यात ५६ लाख १६ हजार ८५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचा रिकव्हरी रेट ९५.४ टक्के नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४०६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. हे प्रमाण २५०च्याही खाली गेले असताना आज त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा १ लाख ६ हजार ३६७ झाला आहे.

आज कुठल्या विभागात किती रुग्णांची नोंद ?

ठाणे – 2127

नाशिक – 1103

पुणे – 2573

कोल्हापूर – 4344

औरंगाबाद – 262

लातूर – 473

अकोला – 562

नागपूर – 322

कोविड-19-संदर्भातील अद्ययावत माहिती

भारतातील सक्रीय रुग्णांची  संख्या आणखी कमी होत 11,21,671 पर्यंत खाली घसरली

गेल्या 24 तासांत सक्रीय रुग्णसंख्येत 46,281 ची घट

सलग चौथ्या दिवशी 1 लाखांपेक्षा कमी रुग्णसंख्येची नोंद

गेल्या 24 तासांत देशभरात 91,702  नवीन रुग्णांची नोंद

आतापर्यंत देशभरात एकूण 2,77,90,073 रूग्ण कोविडमुक्त

गेल्या 24  तासांत 1,34,,580 रूग्ण कोविडमुक्त

सलग 29 व्या दिवशी दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दैनंदिन नोंद होणाऱ्या रुग्णांहून अधिक

रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर वाढून  94.93%

साप्ताहिक पाँझिटिव्हिटी दर सध्या 5.14% 

दैनंदिन पाँझिटिव्हिटी दर 4.49% सलग 18 व्या दिवशी तो,10% पेक्षा कमी.

घेण्यात आलेल्या एकूण चाचण्यांची संख्या वाढत जाऊन ती  37. 42 कोटी वर पोहोचली  

 राष्ट्रव्यापी  लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 24.6 कोटी लसींच्या मात्रा वितरित