राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली आणि अटल पेन्शन योजना ग्राहकांच्या योगदानामुळे निवृत्तीवेतन मालमत्ता 6 लाख कोटी रुपयांवर

नवी दिल्ली,२६ मे /प्रतिनिधी :-

निवृत्तीवेतन निधी  नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) आज राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली  (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना (एपीवाय) अंतर्गत  मालमत्ता व्यवस्थापनाने  (एयूएम)  13 वर्षांनंतर  6  लाख कोटी रुपयांचा (6 ट्रिलियन रुपये)  टप्पा ओलांडल्याची घोषणा केली.  मागील 1 ट्रिलियन रुपयांची एयूएम वाढ केवळ 7 महिन्यांत झाली आहे. 

पीएफआरडीएने गेल्या काही वर्षांत एनपीएस ग्राहकांमध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली असून या योजनेत 74.10 लाख सरकारी कर्मचारी आणि बिगर-सरकारी क्षेत्रातील 28.37 लाख लोक  आहेत. पीएफआरडीएची एकूण ग्राहक संख्या  वाढून 4.28 कोटी झाली आहे.

निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) चे अध्यक्ष सुप्रतिम  बंड्योपाध्याय म्हणाले की, “ऑक्टोबर 2020 मध्ये एयुएम 5 ट्रिलियन रुपये होती आणि सात महिन्यापेक्षा कमी कालावधीत आम्ही 6 ट्रिलियन रुपये टप्पा गाठल्याबद्दल खूप समाधानी आहोत.  एनपीएस आणि पीएफआरडीए वर  ग्राहकांचा विश्वास असल्याचे यावरून दिसून येते. या महामारीच्या काळात  आर्थिक हित जपण्यासाठी सेवानिवृत्ती  नियोजनाला दिले जात असलेले प्राधान्य ही सकारात्मक बाब आहे.”

21मे 2021 पर्यंत एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेंतर्गत ग्राहकांची एकूण संख्या 4.28 कोटी व मालमत्ता व्यवस्थापन (एयूएम) 603,667.02  कोटी रुपयांपर्यंत वाढले.

पीएफआरडीए विषयी

निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) हे वैधानिक प्राधिकरण आहे जे  राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (एनपीएस) आणि निवृत्तीवेतन योजनांचे नियमन आणि सुनियोजित वाढीसाठी संसदेच्या अधिनियमाद्वारे स्थापन करण्यात आले आहे. सुरुवातीला 1 जानेवारी 2004 पासून केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी एनपीएस अधिसूचित करण्यात आले होते.  आणि त्यानंतर जवळपास सर्व राज्य सरकारांनी त्याच्या कर्मचार्‍यांसाठी ती योजना स्वीकारली. एनपीएस सर्व भारतीय नागरिकांना (रहिवासी / अनिवासी / परदेशी) ऐच्छिक तत्त्वावर आणि कंपन्यांच्या कर्मचार्‍यांसाठी विस्तारण्यात आली.