विलासराव देशमुख यांना कुटुंबियांची  पुष्पांजली अर्पण

May be an image of 1 person and standing

लातूर,२६मे /प्रतिनिधी :-लोकनेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त देशमुख कुटुंबियांनी  बाभळगाव येथील विलासबागेतील साहेबांच्या स्मृतिस्थळी पुष्पांजली अर्पण केली.

May be an image of one or more people, people standing, flower and outdoors

आपल्यात असण्याचा स्पर्श आम्हाला पदोपदी जाणवतो. त्यांचा आशीर्वाद नित्य नवी प्रेरणा देतो. लोकसेवेच्या कार्यात ते आपणा सर्वांसाठी स्फूर्तिस्थान आहेत. त्यांचे कार्य दिशादर्शक आहे. त्यांच्या आठवणी नेहमीच नवं बळ देतात. नवा विश्वास देतात.

May be an image of one or more people, people standing and flower
May be an image of one or more people, people standing and flower

उपमुख्यमंत्री अजित पवार

राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून समृद्ध महाराष्ट्र घडवणारे कर्तृत्ववान नेतृत्व, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील 

विलासराव देशमुख यांनी आपले रुबाबदार व दिलखुलास व्यक्तिमत्व आणि अमोघ वक्तृत्वाद्वारे जनसामान्यांच्या मनावर आपली छाप सोडली. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारे, मराठवाड्यातील सहकारी साखर कारखानदारीला दिशा देणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  

महाराष्ट्राचे लोकनेते, मराठवाड्याचे भूमिपूत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

Image

विलासराव देशमुख यांची सून जेनेलियाने देखील तिच्या सास-यांना एक भावूक पोस्ट करत आदरांजली वाहिली आहे. तिने लिहिले आहे,’वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा. आजही आम्हांला तुमची खूप आठवण येते. बापलेकीची ही जी मिठी आहे ती चिरंतन आहे…’ या पोस्ट सोबत तिने लग्नाच्यावेळी विलासरावांना मारलेल्या मिठीचा फोटो शेअर केला आहे.

अमित विलासराव देशमुख

लोकनेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त आज कुटुंबियांसमवेत बाभळगाव येथील विलासबागेतील साहेबांच्या स्मृतिस्थळी पुष्पांजली अर्पण केली.साहेब आपल्यात असण्याचा स्पर्श आम्हाला पदोपदी जाणवतो. त्यांचा आशीर्वाद नित्य नवी प्रेरणा देतो. लोकसेवेच्या कार्यात ते आपणा सर्वांसाठी स्फूर्तिस्थान आहेत. त्यांचे कार्य दिशादर्शक आहे. त्यांच्या आठवणी नेहमीच नवं बळ देतात. नवा विश्वास देतात.

पंकजा मुंडे 

मराठवाड्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते राजकारणातील राजहंस स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! ??