मुळज जटाशंकर देवस्थान यात्रा महोत्सव रद्द 

उमरगा ,१९एप्रिल /प्रतिनिधी 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ,रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू असल्याने सलग दुसऱ्या  वर्षी मुळज (ता उमरगा) येथील ग्रामदैवत श्री जटाशंकर देवस्थान यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र,कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्याच्या सीमावर्ती भागात  मुळज (ता.उमरगा )येथे निसर्ग सौंदर्याने नटलेले प्राचीन शिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले श्री जटाशंकराचे हेमाडपंती मंदीर असून येथे वर्षभरात महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. प्राचीन काळा पासून देवस्थानची जर वर्षी गुढी पाडव्याला काठीची प्रतिष्ठापणा मानकरी असलेल्या सोयराप्पा घराण्याच्या वतीने करण्यात येते. काठीच्या प्रतिष्ठापणेनंतर शिवपार्वती विवाह सोहळा, छबिना, काठी व श्रींची पालखी मिरवणूक, भजन, किर्तन, पोवाडे, भारूडे, जंगी कुस्त्या, महाआरती, महाप्रसाद आदीसह विविध सामाजिक, धार्मिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे देवस्थान समितीच्या वतीने आयोजित करण्यात येतात. या दरम्यान लाखो भाविकांची गर्दी असते. मात्र प्राचीन काळापासून सुरू असलेल्या यात्रा महोत्सव या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधासह संचारबंदी असल्याने मंदीर प्रवेश व दर्शन बंद करण्यात आले आहे. परंपरेनुसार चालत आलेल्या यात्रा महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमासह विधी करण्यात येणार आहेत. यात्रा महोत्सवातील एकही कार्यक्रम पार पडणार नाही. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे याहीवर्षी यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी भाविकांनी घराबाहेर पडू नये असे अवाहन देवस्थान समितीसह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.