काँग्रेस  सेवादलाचे अध्यक्ष  शिवाजीराव बोरगावकर यांचे निधन

लोहा ,१९एप्रिल /प्रतिनिधी 
लोहा तालुका कोर्ट आणि त्यासाठी भव्य इमारत व्हावी म्हणून सातत्याने पाठपुरावा केलेले  अभिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष  काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व वकील  शिवाजीराव बोरगावकर यांचे आज अल्पशा  आजाराने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्ष होते.दोन दिवसापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.

 बोरगाव आकनाक येथेही मूळ रहिवाशी असलेले  शिवाजीराव  बोरगावकर हे देशाचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते पुढे त्यांना राज्याचे मुख्यमंत्री असताना अशोकराव चव्हाण यांच्या काळात नोटरी मिळाली होती.माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी यांचे जिवलग सहकारी मित्र होते. लोह्याला कोर्ट व्हावे यासाठी त्यांचा पुढाकार होता .पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील, माजी सभापती विठ्ठलराव पवार, माजी सभापती व्यंकटराव मुकदम , खा प्रतापराव पाटील चिखलीकर ,माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, कांग्रेसचे अध्यक्ष रंगनाथराव भुजबळ गुरुजी,  के एम पवार, माजी सरपंच डॉ ग.सो गुंडावार यांच्या सोबत त्यांनी काम केले.हैदराबाद येथे उपचारा दरम्यान बोरगावकर यांचे निधन झाले.  त्यांच्या पश्चात बोरगावचे सरपंच भाऊ पुंडा पाटील, दोन भाऊ, पुतणे, दोन मुले असा मोठा परिवार आहे   

काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता हरवला.- कल्याणराव सुर्यवंशी
एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व सतत हसमुख, आणि पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी शेवट पर्यंत एकनिष्ठ राहिलेले  शिवाजीराव बोरगावकर यांच्या निधनामुळे पक्षाची मोठी हानी झाली.एक सच्चा मित्र गमावला या शब्दात काँग्रेसचे जेष्ठ व माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर , काँग्रेस तालुकाध्यक्ष रंगनाथराव भुजबळ यांनीही दुःख व्यक्त केले