५०० बेडचे कोव्हीड केअर सेंटरची तात्काळ उभारणी करावी –  उमरगा राष्ट्रवादीची मागणी 

उमरगा,१३ एप्रिल  /नारायण गोस्वामी 

सध्या उमरगा व परिसरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत असून उपचारासाठी अनेक आडचणी येत आहेत. यात . वाढता प्रादूर्भाव पाहता कमीत कमी ५०० बेडचे कोव्हीड केअर सेंटरची तात्काळ उभारणी करावी अशी मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांनी केली आहे.  कोव्हीड संदर्भात विविध मागण्यांचा गंभीरपणे विचार करुन  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने ,उपविभागीय अधिकारी विठ्ठलराव उदमले यांच्या मार्फत जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन दिले .         

सध्या उमरगा व परिसरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत असून उपचारासाठी अनेक आडचणी येत आहेत. यात . वाढता प्रादूर्भाव पाहता कमीत कमी ५०० बेडचे कोव्हीड केअर सेंन्टरची तात्काळ उभारणी करावी. गेल्या वर्षी गजानन हॉस्पीटल उमरगा (सी.सी.सी.) मुळे बऱ्याच रुग्णांना फायदा झाला. त्याधर्तीवर खाजगी हॉस्पिटल्सना कोव्हीड सेंटरची  मान्यता द्यावी.,  उमरगा शहरातील सर्व डॉक्टरांना विश्वासात घेऊन चर्चा करावी, उपजिल्हा रुग्णालय कोव्हीड सेंटर  असल्यामुळे कोरोना लसीकरण हे पंचायत समिती सभागृहात ठेवावे. ऑक्सीजन प्लॅन्ट हे उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे तात्काळ सुरु करणे गरजेचे आहे. कोरोना पेशंटला चांगल्या दर्जाचे जेवन व पाणी यांची व्यवस्था करावी. यापूर्वीच्या जेवणाचे कंत्राटदार रद्द करूण नवीन टेंडरणे काम द्यावे ,  कार्डिऑक ऍम्ब्युलन्स  उपलब्ध करणे, होमआयसुलेशन घेतलेल्या रुग्णांसोबत संपर्क ठेवण्यास संबंधीतांना आदेशीत करावे., भाजीपाला मार्केट सिड फार्म शिवपुरी रोड येथे स्थलांतरीत केल्यास सुरक्षीत अंतर ठेवण्यास सोईचे होईल .       

या सर्व मुद्यावर गांभीर्याने विचार करून तात्काळ निर्णय घेण्यात यावा असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे . निवेदनावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी उमरगा तालुका अध्यक्ष संजय पवार, नगरसेवक बालाजी पाटील, युवक तालुकाध्यक्ष शमशुद्दीन जमादार ,शहराध्यक्ष खाजा मुजावरआदींच्या सह्या आहेत .