नांदेड :कोरोनातून 5 व्यक्ती झाले बरे 34 व्यक्ती बाधित तर एकाचा मृत्यू नांदेड

नांदेड दि. 10 :- कोरोनाचे जिल्ह्यातील आव्हान वाढत असून आज प्राप्त झालेल्या एकुण 188 अहवालांपैकी 132 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले तर नवीन 34 पॉझिटिव्ह व्यक्ती आढळले. त्यामुळे‍ जिल्ह्यातील बाधित व्यक्तींची एकुण संख्या 558 एवढी झाली आहे.

कोरोना आजारातून आज 5 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित व्यक्ती, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 2 बाधित, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित तसेच औरंगाबाद येथे संदर्भित झालेला 1 बाधित व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 358 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत.

आज शुक्रवार 10 जुलै रोजी कंधार इमामवाडी येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधितास उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत रुग्णांची संख्या 25 एवढी झाली आहे.

नवीन बाधितांमध्ये नांदेड वाघाळा 41 वर्षाचा 1 पुरुष, गोकुळनगर येथील 47 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड मोमिनपुरा येथील 55 वर्षाची 1 महिला, नांदेड हबिबियानगर येथील 70 वर्षाचा 1 पुरुष, दशमेश नगर बाफना येथील 57 वर्षाची 1 महिला, देगलूरनाका येथील 48 वर्षाचा 1 पुरुष, गणेशनगर नांदेड येथील 14 वर्षाची 1 महिला, विजयनगर येथील 68 वर्षाची 1 महिला, वजिराबाद येथील 54 वर्षाचा 1 पुरुष, रविनगर येथील 45 वर्षाचा 1 पुरुष, धुमाळवाडी येथील 45 वर्षाची 1 महिला, 25 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली गांधीनगर येथील 16 वर्षाचा 1 मुलगा, बिलोली तालुक्यातील फारुकी येथील 28 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील तबलीन गल्ली येथील 11 बाधितांमध्ये 3 वर्षाचा बालक, 16,45,43,27 वर्षाचे 4 पुरुष, 9, 13 वर्षाच्या 2 मुली, व 35, 43, 28, 30 वर्षाच्या 4 महिला, मुखेड व्यंकटेशनगर येथील 45 वर्षाचा 1 पुरुष, 38 वर्षाची 1 महिला, मुखेड वाल्मिकनगर येथील 22 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड मदनलपूर येथील 50 वर्षाची 1 महिला, 56 वर्षाचा 1 पुरुष, कंधार इमाम वाडी येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव बळवंतनगर येथील 12 वर्षाचा 1 बालक, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील 33 वर्षाचा 1 पुरुष, परभणी आनंदनगर येथील 34 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे. (नमूद वरीलपैकी 18 बाधित व्यक्तींचा अहवाल गुरुवार 9 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. तसेच उर्वरित 16 बाधित व्यक्तींचा अहवाल शुक्रवार 10 जुलै रोजी दुपारी प्राप्त झाला आहे.)

आज 175 पॉझिटिव्ह बाधित व्यक्तींवर औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची त्यात 10 महिला आणि 8 पुरुष बाधित व्यक्तींची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

नांदेड जिल्ह्यात एकुण 558 बाधितांपैकी 25 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर 358 बाधित व्यक्ती बरे झाले आहेत. उर्वरीत 175 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 50, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 58, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 28, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 7, जिल्हा रुग्णालय येथे 5, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 4 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.

शुक्रवार 10 जुलै रोजी 266 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 592,

घेतलेले स्वॅब- 7 हजार 860,

निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 497,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 34,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 558,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 24,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 6,

मृत्यू संख्या- 25,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 358,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 175,

स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 266 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.