शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा! दहावी ,बारावी परीक्षा पुढे ढकलल्या

मे -जूनमध्ये होणार परीक्षा

मुंबई ,१२ एप्रिल /प्रतिनिधी 

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता. १० वी आणि १२ वी  महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळ बैठकीत आज  घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. १०वीची परीक्षा जून महिन्यात होईल, तर १२ वीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी घेतली जाईल. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.परीक्षांबाबतचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.शिक्षणमंत्री म्हणाल्या, “महाराष्ट्र बोर्डाव्यतिरिक्त इतर जे बोर्ड आहेत, त्यांना देखील राज्य सरकारच्या निर्णयावर अंमलबजावणी करावी, अशी विनंती आम्ही करणार आहोत.”

महाराष्ट्रातील सध्याची #COVID-19 ची परिस्थिती पाहता व यामुळे विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये असलेले तणावाचे वातावरण व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता इ.१० वी व इ.१२ वी च्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.आम्ही आरोग्य आणि सुरक्षितेबाबतच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. त्यानुसार, या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, शिक्षण तज्ज्ञ आदींसोबत चर्चा केल्यानंतरच परीक्षेबाबतचा सुधारीत निर्णय घेण्यात आला आहे.