पंतप्रधानांनी कोविड -19 लसीची दुसरी मात्रा घेतली

नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2021:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 लसीची दुसरी मात्रा घेतली.

एका ट्विटमध्ये  मोदी म्हणाले ” आज एम्समध्ये मी  कोविड-19 लसीची दुसरी मात्रा घेतली.

विषाणूवर मात करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या काही मोजक्या  मार्गांपैकी  लसीकरण एक आहे .

जर तुम्ही लस घेण्यास पात्र असाल तर लवकरच लस घ्या . CoWin.gov.in वर नोंदणी करा. “