नांदेड जिल्ह्यात 697 व्यक्ती कोरोना बाधित,पाच जणांचा मृत्यू

नांदेड दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 126 अहवालापैकी 697 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 405 तर अँटिजेन तपासणीद्वारे 292 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 29 हजार 842 एवढी झाली आहे.

गुरुवार 18 मार्च 2021 शिवाजीनगर मालेगाव रोड नांदेड येथील 57 वर्षाच्या एका पुरुषाचा, स्वामी विवेकानंद नांदेड येथील 57 वर्षाच्या एक महिलेचा, सिडको नांदेड येथील 59 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर शुक्रवार 19 मार्च 2021 रोजी लोहा येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा व मालेगाव रोड नांदेड येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 632 एवढी झाली आहे.

आजच्या 3 हजार 126 अहवालापैकी 2 हजार 295 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 29 हजार 842 एवढी झाली असून यातील 24 हजार 814 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 4 हजार 170 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 51 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 15, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 173, माहूर तालुक्यांतर्गत 3, देगलूर कोविड रुग्णालय 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 26, मुखेड कोविड रुग्णालय 7, धर्माबाद तालुक्यांतर्गत 3, खाजगी रुग्णालय 20 असे एकूण 249 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.15 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 63 हजार 212 एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 28 हजार 520एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 29 हजार 842एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 814एकुण मृत्यू संख्या-632उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.15 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-117आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-17आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-328रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 170आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-51.