औरंगाबाद पदवीधर निवडणूक :3 लाख 74 हजार 45 मतदार ,813 मतदान केंद्र
औरंगाबाद ,दि.25 :- येत्या 01 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी विभागातील आठ जिल्ह्यात एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार असून मतदानासाठी एकूण 813 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रांची संख्या कंसात दर्शविली आहे.
1) औरंगाबाद-106379 (206)
2) जालना- 29765 (74)
3) परभणी – 32681 (78)
4) हिंगोली – 16764 (39)
5) नांदेड – 49285 (123)
6) बीड- 64349 (131)
7) लातूर – 41190 (88)
8) उस्मानाबाद – 33632 (74).
अशी माहिती निवडणूक शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली आहे.