महापुरूषच पूर्ण पुरुषाला म्हणजेच परमेश्वराला पूर्ण पणे प्राप्त करतात:स्वर्वेद पंचम मण्डल चतुर्थ अध्याय
“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.
आजचा दोहा
ऐसा दृढ़ संकल्प हो, कोटि विघ्न यदि आय ।
तभी विकल्प न हो सके, पूरण पूरण पाय ।।४०।।
(स्वर्वेद पंचम मण्डल चतुर्थ अध्याय) ०५/०४/४०
मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
असा दृढ संकल्प असावा की, कोटी विघ्ने आली तरीही पुरुषार्थ सोडू नये , कितीही कष्ट पडले किंवा अडचणी आल्या तरीही हाती घेतलेलं कार्य सोडून मागे हटू नये . पूर्ण पुरुषार्थी, महापुरूषच पूर्ण पुरुषाला म्हणजेच परमेश्वराला पूर्ण पणे प्राप्त करतात. ते कितीही कठीण प्रसंग आले तरीही आपल्या कार्यात विकल्प न करता म्हणजेच कार्य अर्धवट न सोडता कठीण पुरुषार्थाद्वारे आपला सत्यसंकल्प पूर्ण करतात.
संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्सॲप करा ८५५४८८३१६६.