सदाचरणाने सर्व सुख साधनांमध्ये जागृती

“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा 

ब्रह्मचर्य सुख हेत है, वीतराग सब त्याग । 

सुख का कारण हरिभजन,सदाचार सुख जाग ।।४९।।

(स्वर्वेद पंचम मण्डल एकादश अध्याय) ०५/११/४९

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

सुखाचे कारण ब्रह्मचर्य आणि समस्त विषयांचा त्याग आहे.  सुखाचे कारण हरिभजन म्हणजेच परमेश्वराची भक्ती आहे. सदाचरणाने सर्व सुख साधनांमध्ये जागृती रहाते.  म्हणून सदाचरणाचे अत्यंत महत्त्व आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org