माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आंदोलनाला वंचित बहुजनचा आघाडी जाहीर पाठिंबा

औरंगाबाद,​७​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-औरंगाबाद महानगरपालिकेसमोर कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कालपासून पाणी आणि विविध प्रश्नांसाठी सत्याग्रह आंदोलन करीत असून कालपासून आजपर्यंत आंदोलन कर्ते हे माजी आमदार असतानासुद्धा हर्षवर्धन जाधव यांच्या मागण्याकडे प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असून त्याचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करीत आहे त्याचप्रमाणे हर्षवर्धन जाधव यांच्या लोकहित्याच्या या सर्व मागण्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असून हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेल्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

या प्रकरणी जर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय सुद्धा राहणार नाही याची नोंद प्रशासनाने घ्यावी असे पत्रच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहेमद, मुस्लिम इत्तेहाद फ्रटचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक जावेद कुरेशी,प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सिद्धार्थ  मोकळे, महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पूर्व प्रभाकर मामा बकले, पश्चिम जिल्हा अध्यक्ष योगेश बन औरंगाबाद शहर मध्यचे शहराध्यक्ष  जलीस अहेमद, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर,युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सतीश शिंदे, जिल्हा महासचिव जिल्हा के के जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे शहर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

महानगर पालिकेच्या निवडणुकीसह जिल्हाभरातील सर्वच निवडणुकांत मी वंचित बहुजन आघाडी सोबत असलो तर आनंदच होईल. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहेमद यांनी अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत माझी भूमिका सांगावी अशी माझी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील एकाही राजकीय पक्षाने माझ्याकडे पाहिले नाही अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार मला खुप प्रभावी वाटतात असे हर्षवर्धन जाधव म्हणाले.