आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे; निलेश राणेंची दीपक केसरकरांना ऑफर

मुंबई : दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणेंवर थेट आरोप केले होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असे त्यांनी म्हटले. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप नेते निलेश राणेंनी तर ट्विट करत आक्रमक शैलीत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे!”, असे ट्विट करत निलेश राणेंनी केसरकरांवर हल्ला केला आहे.