भारतामध्ये सक्रिय रूग्णसंख्या दीड लाखांपेक्षा कमी

देशामध्ये कोरोनाची सक्रिय रूग्णसंख्या दीड लाखांपेक्षा कमी आहे. आज देशात 1,47,306 कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. एकूण रूग्णसंख्येच्या प्रमाणापैकी सक्रिय रूग्णसंख्येचे प्रमाण 1.34 टक्के आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशात 10,584 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 13,255 रूग्ण या आजारातून बरे झाल्याची नोंद आहे. यामुळे एकूण सक्रिय रूग्णांमध्ये 2,749 प्रकरणांची घट झाली आहे.

भारतामध्ये कोरोना होण्याचा दैनिक दर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.कोविड-19मुळे होणा-या दैनंदिन मृत्यूदरामध्ये सातत्याने घट नोंदवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 78 जणांचा या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

कोविड-19मुळे होणा-या दैनंदिन मृत्यूदरामध्ये सातत्याने घट नोंदवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 78 जणांचा या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

दि. 22 फेब्रुवारी, 2021 पर्यंत (लसीकरण मोहिमेच्या 38व्या दिवशी) 2,44,877 सत्रांच्या माध्यमातून 1,17,45,552 जणांना कोविडविरोधी लस देण्यात आली आहे, अशी माहिती आज सकाळी 8.00 वाजता तयार करण्यात आलेल्या हंगामी अहवालामध्ये नोंदविण्यात आली आहे. भारतामध्ये या आजारामधून आत्तापर्यंत 1.07 कोटी (1,07,12,665) रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा आजचा दर 97.22 टक्के आहे. सक्रिय रूग्णसंख्या आणि बरे होणा-या रूग्णांची संख्या यांच्यामध्ये तफावत वाढत असून आज दोन्ही संख्येत 1,05,65,359 इतके अंतर आहे.

कोरोना आजारातून पूर्ण बरे झालेल्या रूग्णांपैकी 86.56 टक्के रूग्ण सहा राज्यांमधले आहेत.

केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात एका दिवसात 5,035 रूग्ण बरे झाल्याची नोंद आहे. गेल्या 24 तासांमध्ये केरळमधले 5,037 रूग्ण बरे झाले तर तामिळनाडूमधले 461रूग्ण बरे झाले आहेत.नवीन केरोनाबाधित रूग्णांपैकी 84 टक्के रूग्ण सहा राज्यांमध्ये आहेत.महाराष्ट्रात सातत्याने नवीन रूग्ण जास्त संख्येने आढळत आहेत. महाराष्ट्रात एका दिवसात 5,210 नवीन रूग्ण आढळले. त्याखालोखाल केरळमध्ये 2,212 रूग्ण सापडले तर तामिळनाडूमध्ये एका दिवसात 449 जणांना कोरोनाची बाधा झाली.

कोरोना या आजारामुळे निधन झालेल्या रूग्णांपैकी 84.62 टक्के रूग्ण सहा राज्यांतले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 18 जणांचे या आजाराने निधन झाले, त्याखालोखाल केरळमधल्या 16 जणांचा मृत्यू झाला आणि पंजाबमधल्या 15 जणांना या आजारामुळे प्राण गमवावे लागले.