भारतातील सक्रीय रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 3.62 टक्के

 नवी दिल्ली ,दिनांक १३  :  भारतातील एकूण रुग्णसंख्येपैकी सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 3.62 टक्के पर्यंत खाली आले आहे. दररोजच्या रुग्णसंख्येपेक्षा बरे होण्याचे रुग्णांचे प्रमाण अधिक असल्यामुळे भारताची सक्रिय रुग्णसंख्या सतत्याने कमी होत आहे आणि आज ती 3,56,546 इतकी आहे.देशभरात गेल्या 24 तासात 30,254 व्यक्ती कोविड बाधित असल्याचे आढळले आहे तर त्याच काळात 33,136 इतकी बरे झालेल्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001UH7Y.jpg

गेल्या सात दिवसात जगभरात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे सर्वाधिक कमी रुग्णसंख्या असणाऱ्या देशांपैकी  भारत (158) एक आहे, पश्चिम गोलार्धातील अन्य देशांपेक्षा ती बरीच कमी आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002IMPI.jpg

आजवर  बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 93,57,464 इतकी आहे. नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 75.23 टक्के संख्या 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003BNBS.jpg

5,268 इतके कोविड रुग्ण बरे होऊन केरळ आघाडीवर आहे तर महाराष्ट्रात 3,949 इतकी बरे झालेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004BHNA.jpg

नवीन आढळलेल्या रुग्णांपैकी 75.71 टक्के रुग्ण दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.गेल्या 24 तासात केरळमध्ये 5,949 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात काल 4,259 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005BOI5.jpg

गेल्या 24 तासात 391 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 77.78 टक्के मृत्यूंची नोंद ही दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहे. गेल्या 24 तासात कोणत्याही राज्ये / केंद्रशासित प्रदेशात मृत्यूचा आकडा दोनअंकी पर्यंत गेलेला नाही.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006F9SL.jpg

एकूण मृत्यूंपैकी 79.28 टक्के मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली आहे, जी 80 इतकी आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007S9LB.jpg

जागतिक पातळीवर तुलना केली असता, गेल्या 7 दिवसांत प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे नवीन रुग्णांच्या मृत्यूची सर्वांधिक कमी नोंद असणाऱ्या देशात भारत (2) आहे.