जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेत माय मराठीचाही समावेश आहे – उद्घाटक विश्वास पाटील

मराठी भाषा :अत्यंत समृद्ध वारसा लाभलेली भाषा-लेखक व कवी जावेद अख्त्तर

नाशिक ,३ डिसेंबर /प्रतिनिधी:- नाशिक ही गुणवंताची, बुध्दीवंतांची भूमी असून साहित्याच्यादृष्टीने रत्नांची खाण आहे. जगात सर्वात जास्त ज्या दहा भाषा बोलल्या जातात. त्यात आमची माय मराठी आहे असे प्रतिपादन संमेलनाचे उदघाटक व साहित्यिक विश्वास पाटील यांनी यावेळी केले. त्या भाषेचे शेक्सपिअर वि. वा. शिरवाडकर हे होते. त्यांचे विशाखा हे महाकाव्य होते. जिल्ह्यातील विविध साहित्यिकांची उदाहरण देताना तात्यासाहेब हे माझे अजिंठा होते तर कानेटकर हे वेरूळ होते .असे सांगून पानिपत लिहिल्यानंतर तात्यासाहेब ती मी ज्या टेबलावर लिहिली त्याचे अवलोकन करण्यासाठी ते मिरजेत आले होते असे सांगून त्यांनी शिवरायांच्या स्मृती जपल्या पाहिजेत अशी अपेक्षाही व्यक्त करून  यारी आणि दिलदारीमध्ये नाशिकचा हात कोणीही धरणार नाही असेही ते म्हणाले.

साहित्य समंलेनाच्या माध्यमातून सर्व भाषा एकत्र आल्या पाहिजेत – जावेद अख्तर

भाषेमुळे संवादातील अडथळे दूर होतात. संस्कृती जोपासण्यासाठी भाषा हि सेतू सारखे काम करते, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्व भाषा व प्रादेशिक भाषा एकत्र आल्या पाहिजेत. जो जनतेशी संवाद साधतो तोच खरा मोठा लेखक असून, मराठी भाषा हि अत्यंत समृद्ध वारसा लाभलेली भाषा असून देशातील पहिल्या महिला डॉक्टरही मराठी आहे असे नमूद करून साहित्यिकांनी प्रामाणिपणे काम केले पाहिजे असे आपल्या मनोगतात यावेळी प्रसिद्ध साहित्यिक, पटकथाकार, लेखक व कवी जावेद अख्त्तर यांनी यावेळी केले.