परभणी मनपाच्या वतीने 605 शिक्षकांची आरटीपीसीआरद्वारे तपासणी

परभणी – माध्यमिक शाळा नववी ते बारावी पर्यंत शासनाच्या आदेशानुसार 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महानगरपालिका आरोग्य केंद्राने शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांची कोविड-19 ची 9 सेंटरवर 605 शिक्षकांची आरटीपीसीआरद्वारे तपासणी करण्यात आली.
शहरातील सिटी क्बल येथे 164, मनपा रुग्णालय 132, आरोग्य केंद्र खानापूर 99, इनायत नगर आरोग्य केंद्र 30, दर्गा रोड आरोग्य केंद्र 71, वर्मा नगर आरोग्य केंद्र 64, खाजगी रुग्णालय 9 अशा एकूण 605 शिक्षकांची तपासणी करण्यात आली. अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.