आजपासून घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ; ‘ही’ असणार नवी किंमत

नवी दिल्ली : 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपर्ण देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता सामान्य जनतेला महागाईचा झटका बसला आहे. कारण आज पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. 

Lpg Gas Cylinder Price Hike From 1 June 2020 By Oil Companies ...


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत विना अनुदानित सिलिंडर च्या किंमतीत 11.50 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता नवीन किंमत 592 रुपये झाली आहे. मुंबईत विना अनुदानित सिलिंडर ची किंमत 11.50 रुपयांनी वाढ झाली आहे. दर वाढीपूर्वी याची किंमत 579 होती. ती आता 590.50 रुपये झाली आहे. तर कोलकाता मध्ये 584.50 वरून 616 रुपये आणि चेन्नईमध्ये 569.50 वरून 606.50 रुपये झाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *