जालना जिल्ह्यात 92 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

रुग्णांना 103 यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.17 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 103 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 83 तर अँटीजेन तपासणीद्वारे 9 असे एकुण 92 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15945 असुन सध्या रुग्णालयात-190 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5580 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-525 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-62282 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-114, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-92 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9790 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-51603, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-726, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4750
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-23, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5070 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-45 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-173 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-18, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-190,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-29, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-103, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7633, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1904 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1,47,777 मृतांची संख्या-253.

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 7633 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असुन जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.96 टक्के एवढे झाला आहे. सध्या जिल्ह्यातील मृत्युदर 2.58 टक्के एवढा असुन आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 62 हजार 282 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 9 हजार 790 नमुने पॉझिटिव्ह आले असुन त्याचे प्रमाण 15.68 टक्के एवढे आहे. सध्या जिल्ह्यात 66 हजार 989 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 173 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.