कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत घट; बरे होणाऱ्यांची संख्या साडेअकरा लाखांच्या उंबरठ्यावर

Image
Rajesh Tope

मुंबई, दि.४: राज्यात आज कोरोनाचे १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६४ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५५ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमुन्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.२९ टक्के) आले आहेत. राज्यात  २२ लाख  ०९ हजार ६९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २७ हजार ९३९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले

आज निदान झालेले १३,७०२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-२१०९ (४८), ठाणे- २४८ (२), ठाणे मनपा-३६० (७), नवी  मुंबई मनपा-२७८ (९), कल्याण डोंबिवली मनपा-४१४ (८), उल्हासनगर मनपा-५२, भिवंडी निजामपूर मनपा-५३ (२), मीरा भाईंदर मनपा-१९९ (५), पालघर-१२० (२), वसई-विरार मनपा-१३६ (२), रायगड-१९२ (५), पनवेल मनपा-१७१ (३), नाशिक-३३८ (२), नाशिक मनपा-६६४ (६), मालेगाव मनपा-३२, अहमदनगर-५४४ (७), अहमदनगर मनपा-९५, धुळे-१५ (१), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-१४० (७), जळगाव मनपा-८३ (१), नंदूरबार-२३, पुणे- ८१४ (१२), पुणे मनपा-१०३३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-४९६ (४), सोलापूर-३६० (५), सोलापूर मनपा-६० (१), सातारा-६४५ (४८), कोल्हापूर-१९८ (६), कोल्हापूर मनपा-५९ (२), सांगली-४०३ (११), सांगली  मिरज कुपवाड मनपा-६९ (३), सिंधुदूर्ग-२५ (३), रत्नागिरी-८१ (४), औरंगाबाद-५५ (१),औरंगाबाद मनपा-१९३ (५), जालना-८६ (४), हिंगोली-२८ (१), परभणी-६४, परभणी मनपा-२६ (३), लातूर-११३ (२), लातूर मनपा-७९ (२), उस्मानाबाद-१३६ (२), बीड-१५८ (१०), नांदेड-५६ (२), नांदेड मनपा-५८ (१), अकोला-२० (१), अकोला मनपा-४७, अमरावती-५८ (१), अमरावती मनपा-९७ (५), यवतमाळ-१०५ (५), बुलढाणा-११८, वाशिम-९८, नागपूर-२८० (४), नागपूर मनपा-६३७ (२२), वर्धा-१३३, भंडारा-१३४ (२), गोंदिया-१३० (८), चंद्रपूर-१२०, चंद्रपूर मनपा-७८, गडचिरोली-५३, इतर राज्य-८ (३).

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (२,१३,६५२) बरे झालेले रुग्ण- (१,७६,०१७), मृत्यू- (९१०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४१९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,१०८)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,९३,९९२), बरे झालेले रुग्ण- (१,५९,५३८), मृत्यू (५००६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,४४७)

पालघर: बाधित रुग्ण- (३८,१९७), बरे झालेले रुग्ण- (३०,३१५), मृत्यू- (९०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९७७)

रायगड: बाधित रुग्ण- (५३,१३९), बरे झालेले रुग्ण-(४४,५५९), मृत्यू- (१२७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३००)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (८८२७), बरे झालेले रुग्ण- (६४५६), मृत्यू- (२८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०८३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४१३१), बरे झालेले रुग्ण- (३००४), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२४)

पुणे: बाधित रुग्ण- (३,०३,१३८), बरे झालेले रुग्ण- (२,३८,८००), मृत्यू- (५९७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८,३६५)

सातारा: बाधित रुग्ण- (३९,२६९), बरे झालेले रुग्ण- (३०,२०७), मृत्यू- (११०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९५२)

सांगली: बाधित रुग्ण- (४०,१३१), बरे झालेले रुग्ण- (३१,३२२), मृत्यू- (१२४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५६४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४४,६६२),बरे झालेले रुग्ण- (३६,५७३), मृत्यू- (१३७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७१५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३७,७६०), बरे झालेले रुग्ण- (३०,४६३), मृत्यू- (११८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६११४)

नाशिक: बाधित रुग्ण- (८०,३२२), बरे झालेले रुग्ण- (६२,४१६), मृत्यू- (१३५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६,५५४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४४,९७२), बरे झालेले रुग्ण- (३५,३९९), मृत्यू- (७०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(८८६५)

जळगाव: बाधित रुग्ण- (४८,८३१), बरे झालेले रुग्ण- (४२,१२७), मृत्यू- (१२७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४२८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५५०३), बरे झालेले रुग्ण- (४६६५), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१५)

धुळे: बाधित रुग्ण- (१२,७४७), बरे झालेले रुग्ण- (११,६३४), मृत्यू- (३३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३७,४०९), बरे झालेले रुग्ण- (२६,४३८), मृत्यू- (९१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,०५८)

जालना: बाधित रुग्ण-(८०७९), बरे झालेले रुग्ण- (६१३२), मृत्यू- (१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५०)

बीड: बाधित रुग्ण- (११,०९२), बरे झालेले रुग्ण- (७९६५), मृत्यू- (२९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३२)

लातूर: बाधित रुग्ण- (१८,२३१), बरे झालेले रुग्ण- (१४,०२०), मृत्यू- (५१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९७)

परभणी: बाधित रुग्ण- (५७२९), बरे झालेले रुग्ण- (४०४५), मृत्यू- (२०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३१७३), बरे झालेले रुग्ण- (२४९६), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१६)

नांदेड: बाधित रुग्ण- (१६,६५२), बरे झालेले रुग्ण (१०,६७४), मृत्यू- (४१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५६३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१३,१३१), बरे झालेले रुग्ण- (९३६२), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३८७)

अमरावती: बाधित रुग्ण- (१४,३५६), बरे झालेले रुग्ण- (११,९७९), मृत्यू- (२८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९३)

अकोला: बाधित रुग्ण- (७६६२), बरे झालेले रुग्ण- (६३९२), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०३५)

वाशिम: बाधित रुग्ण- (४७०४), बरे झालेले रुग्ण- (३८८९), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८४८०), बरे झालेले रुग्ण- (५६२८), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७२८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (९२५९), बरे झालेले रुग्ण- (७१३३), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८९०)

नागपूर: बाधित रुग्ण- (८१,७४२), बरे झालेले रुग्ण- (६७,८७२), मृत्यू- (२१७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,६८३)

वर्धा: बाधित रुग्ण- (४८७१), बरे झालेले रुग्ण- (३०९१), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९८)

भंडारा: बाधित रुग्ण- (६२८९), बरे झालेले रुग्ण- (४४७६), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७६१३), बरे झालेले रुग्ण- (५३७७), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१४७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (११,३३८), बरे झालेले रुग्ण- (६७५७), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४२८)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२६७०), बरे झालेले रुग्ण- (१९५४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७००)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१६५६), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८१)

एकूण: बाधित रुग्ण-(१४,४३,४०९) बरे झालेले रुग्ण-(११,४९,६०३),मृत्यू- (३८,०८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४४१),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,५५,२८१)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३२६ मृत्यूंपैकी २१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५७ मृत्यू  सातारा – २२, पुणे – ७, ठाणे – ५, यवतमाळ – ५, जळगाव – ३, सिंधुदुर्ग – २, नागपुर- २, परभणी – २, अहमदनगर – १,         बीड – १, धुळे – १, गोंदिया – १, जालना – १, नांदेड – १, रायगड – १, सोलापुर – १ आणि  भंडारा -१. असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. आज जिल्हा आणि मनपा निहाय २० सप्टेंबर  २०२० पर्यंतचे कोविड बाधित रुग्णांचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. रुग्णांची दुहेरी नोंद वगळणे, रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेला बदल यामुळे आज एकूण बाधित रुग्णसंख्येत ११५४ रुग्णांची घट झाली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)