मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे पुन्हा बेमुदत उपोषण 

जालना ,२५ऑक्टोबर / प्रतिनिधी :-४० दिवसात सरकारने आरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही हालचाली केल्या नाहीत.म्हणून आज पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहे.पहिलं १७ दिवसांचं आमरण उपोषण झालं.त्यावेळी सरकारने आग्रह केला म्हणून पाणी व उपचार घेतले मात्र आता कोणत्याही आरोग्य सेवा किंवा पाणी घेणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की,आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो.सरकारने आरक्षण देतो म्हणून आश्वासन दिल्यानं ४० दिवस साखळी उपोषण सुरू केलं.आरक्षण नसल्यानं आमच्या पोरांचं आयुष्य वाया गेलं.सर्व पक्षांनी मुंबईत ठराव पास केला,आमच्याकडून मुदत मागितली आम्हीही सर्वांचा सन्मान करत वेळ दिला. पण आमच्या वेदना जाणून घेतल्या नसल्याचा आरोप सर्वपक्षीय नेत्यासह सरकारवर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मराठ्यांना आरक्षण दिलं नाही.सरकारने २ दिवसांत आमच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं ते पण पाळल नाही.आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना कोणतीही मदत आणि नोकरी दिली नाही,अनेक आंदोलक पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाले त्यांच्यावर अजूनही काही जणांवर उपचार सुरू आहेत.त्यातील काहींना मदत नाही.सभेच्या दिवशी शेतीचं काही प्रमाणात नुकसान झालं. त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी जरांगे यांनी यावेळीकेली.
तरुणांनो आत्महत्या करू नका,आपण मरायचं नाही लढायचं आहे,एका जीवाने आपण लढू, शांततेत लढू. आपण आरक्षणासाठी सरकारच्या दारात जायचं नाही. त्यांनीही आपल्याकडे येऊ नये.आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहू.साखळी उपोषण ठरलं त्या प्रमाणे करावं असे ही ते म्हणाले.
ऑन गिरीश महाजन कॉल–मि त्यांचा मान सन्मान राखला,त्यांनी 12 दिवस मागितले आम्ही खूप दिवस दिले.यांना कुणी आमचं आयुष्य बरबाद करण्याचा अधिकार दिला.आम्ही आरक्षणाच्या निकषात बसतो तरीही आम्हाला आरक्षण नाही १९६७,१९९० साली कोणते निकष लावून आरक्षण दिलं.त्या निकषात आम्ही बसतो. त्यानुसार आम्हाला आरक्षण द्या.
मराठ्यांची कुणबी पोट जात होते तरीही आम्हाला आरक्षण नाही.मागास सिद्ध होऊनही आमहाला आरक्षण नाही,तुम्ही भावनिक साद घालू नका,आमच्या ७ पिढ्या गेल्या. आता आम्हाला आरक्षण द्या.बीड जिल्ह्यात ६६ पैकी ६४ गावात आम्हाला कुणबी असलयाचे पुरावे मिळाले. समितीला का मिळाले नाही? एक पुरावा जर सापडला तर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागणार.मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांचा मान सन्मान राखावा.आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो.तुम्ही आतापर्यंत आरक्षण का दिलं नाही.आमही आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता आमच्या लेकरा बाळांचं प्रश्न आहे.
२ हजार १२ गावात नेत्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे असा आमच्याकडे आकडा आहे.यापुढं चर्चा नाही आता आरक्षण घेऊ या .तुम्ही फक्त जीआर घेऊन या.सरकारला पर्याय देतो पंजाबराव देशमुख साहेबांनी कुणबी समाजाला आरक्षण दिलं तो पर्याय वापरून आमहाला आरक्षण द्या,ज्यांच्याकडे शेती आहे त्याचा ७ /१२ जोडून आरक्षण द्या.आमरण उपोषण सुरू राहील महाराष्ट्रात शांततेने आंदोलन करा.

संभाजी राजे आमचे दैवत..
आम्हाला पाठिंबा देण्यासाठी संभाजीराजे येत आहेत. ते राजे आहे.संभाजी राजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले ते आमचे दैवत आहेत.त्यांना गाव बंदी कशी असेल.ते आमचे आहेत .ते केव्हाही येवू शकतात.

नेत्यांना गाव बंदी
नेत्यांचं गावात काही काम नाही. आमच्या दारात येऊ नका.तुमच्या पोरांना बंगले गाड्या झाल्या आमच्या पोरांचं काय.आमच्या दारात येऊन आमची कडी वाजवण्याची गरज नसल्याचे मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.