हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. ३ : थोर स्वातंत्र्यसेनानी व हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, उप सभापतीचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबूडकर, विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये  स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

थोर स्वातंत्र्य सेनानी, हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांचा दि. ०३ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठ प्रांगणातील पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास चंदनहार आणि त्यानंतर स्वागत कक्षामध्ये पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विभागाचे प्र. अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलीकार्जुन करजगी, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे, डॉ. रवि सरोदे, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.