मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार घेणार-मनोज जरांगे

जालना ,११ सप्टेंबर /प्रतिनिधी :- अंतरवाली सराटी येथे आज आंदोलनाचा चौदावा दिवस असल्याने मनोज जरांगे यांनी सरकार दिलेला चार दिवसाची मुदत परवा रात्री संपल्याने ,पाणी उपचार तसेच, तपासणीसाठी चौदावा दिवसी नकार देवुन मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच तपासणी, उपचार घेणार असल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली.त्यांची प्रकृती खुप खालवत चालली आहे, .
मराठा समाजाला सरसकट आरक्षण दयावे, आंदोलकावरील गुन्हे मागे लाठीहल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे या मागणीवर मनोज जरांगे पाटील आज ही ठाम आहेत.
परवा रात्रीपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्यास, व तपासणी ,उपचाराचा त्याग केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षण माझी मुख्य वेदना आहे तर मराठा आरक्षण हेच माझ्यावर आता उपचार असुन तर सर्व पक्षीयांनी मराठा समाजाच्या पाठिशी उभं राहावं, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांने म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १४ दिवसांपासून उपोषण करत आहेत.जरांगे यांनी पाणी पिणे, उपचार घेणे बंद केले आहे. वैद्यकीय पथक सोमवारी सकाळी वैद्यकीय पथक १०:४० वाजता उपोषणस्थळी आले होते. पथकातील डॉ. अतुल तांदळे यांनी सांगितले बीपी, शुगर सह इतर तपासण्या करू द्या, अशी विनवणी केली परंतु, जरांगे यांनी तपासणी, उपचारालाही नकार दिला. यावेळी डाँक्टर तांदळे म्हणाले कि उपोषणाचा आज चौदावा दिवस असल्याने उपचार पाणी बंद केल्याने शरीरातील पाणीपातळी व ब्रेडप्रेशर खालवले असून ते आपले मुद्दे मांडतात पण तपासणी उपचारासाठी नकार देतात यावेळीवरीष्ठ अधिकारी शितल शिनगारे ह्या पण तपासणी करण्यासाठी हजर होते,परंतु कोणालाही आज तपासणी उपचार करु दिले नाही.