“महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमाव्दारे राज्य महिला आयोगाची लातूर येथे सोमवारी जनसुनावणी

लातूर ,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :- महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता “महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाव्दारे लातूर जिल्ह्यात दिनांक २८ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता डि.पी.डि.सी. सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर जन सुनावणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिकस्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता तक्रारदार पिडीत महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी. कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्व सुचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहुन लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल. याकरीता जिल्हातील सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की, आपली कोणत्याही शासकिय विभागाकडील व कौटुंबिक हिंसांचार संबंधीच्या प्रलंबित असलेल्या तक्रारीबाबत किंवा नवीन तक्रार लेखी नोंदवून सुनावणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे जिल्हाधिकारी व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी देवदत्त गिरी यांनी केले आहे.

रुपाली चाकणकर यांचा लातूर दौरा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

28 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या उपस्थितीत लातूर शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी महिला शहर, जिल्हा कार्यकारणीची बैठक होईल.

28 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमती चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जनसुनावणी होईल. दुपारी दोन ते तीन राखीव. दुपारी तीन वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक होईल. सायंकाळी पाच वाजता त्या पत्रकार परिषद घेतील. सायंकाळी सहा वाजता धायरी, पुणेकडे प्रयाण करतील.