मोदींसोबत व्यासपीठावर जाण्यावरुन काँग्रेसचे शरद पवारांना आवाहन ; म्हणाले, “अशा व्यक्तीसोबत कार्यक्रमाला उपस्थित राहू नये “

मुंबई,३१ जुलै /प्रतिनिधी :-टिळक स्मारक ट्रस्टकडून यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रय पुरस्काराने गौरवीत करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात नरेंद्र मोदींसोबत शरद पवार ही उपस्थित असणार आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असं आवाहन शरद पवार यांना केलें जात आहे. तसंच शरद पवार यांनी कार्यक्रमाला जाण्याआधी एकदा विचार करावा, असा सल्ला देखील या नेत्यांनी दिला आहे.

ट्रस्टीचे प्रमुख दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना पुरस्कार देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट वेगळा झाल्यापासून पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येत आहेत. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का? असा प्रश्न सगळयांना पडला आहे. परंतु रोहित टिळक यांनी शरद पवार हे कार्यक्रमाला असतील असा विश्वास दिला आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी आता शरद पवार यांना आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला येत आहेत. शरद पवार हे त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे कि, त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी थोडा विचार करावा. सद्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी शक्यतो या कार्यक्रमाला जाणं टाळावं. महाविका आघाडी म्हणून नरेंद्र मोदी आणि मणिपूर घटनेबद्दल जनतेमध्ये जातोय. त्याचा निषेध करतोय, अशी व्यक्ती जी मणिपूरला गेलीच नाही, त्यांच्यासोबत व्यासपीठावर जाणं कितपत योग्य आहे? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. तसंच त्यांनी शरद पवार यांनी काँग्रेसतर्फे आवाहन करत या कार्यक्रमाला जाण्याबाबत विचार करावा, असं आवाहन देखील केलं आहे.

दरम्यान, महिला मणिपूर मध्ये मदतीचा हात मागत होत्या. पण केंद्राने फक्त तमाशा पहिला. यावेळी पंतप्रधान फॉरेनला फिरत होते. पण त्यांना मणिपूरला जाण्यासाठी वेळ नव्हता. तसंच त्यांनी काही मदत केली नाही. रोहित टिळक यांना याबाबत समज देण्यात आली आहे. सर्व हेवेदावे विसरून या ठिकाणी विरोध करणं गरजेचं आहे. महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मोदींसोबत व्यासपीठावर जाण्यावरुन राऊत स्पष्टच बोलले

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये, असं वक्तव्य केलं आहे. ते दिल्ली येथे बोलत होते.

देशात मोदीविरोधकांनी एकमूढ बांधली असताना शरद पवार यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होताना दिसत आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. शरद पवार यांनी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करु नये, त्यांनी लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा, असं मत राऊत यांनी मांडलं आहे.

यावेळी बोलाताना राऊत म्हणाले की, आम्ही शरद पवार यांना कोणताही सल्ला देणार नाही, लोक असंतुष्ट आहेत. लोकांच्या मनात असंतोष आहे. तो स्पष्ट खदखदताना दिसत आहे. त्यांना नाबेल अथवा कोणता पुरस्कार मिळाल हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही पूरस्कारासंबंधी कोणतीही भूमिका घेणार नाहीत. मात्र, महाविकास आघाडी अथवा इंडियातील नेते तिथे जातात, तेव्हा लोकांच्या मनातील संभ्रम निर्माण होतो. शरद पवार अनुभवी नेते असून संभ्रम काय हे त्यांना आम्ही सांगायला नको. असं संजय राऊत म्हणाले आहेत.