आगामी मंत्रिमंडळ विस्तारात दोन ते तीन महिलांना स्थान मिळले – चित्रा वाघ

आदिती तटकरे यांना शिंदे सरकारमध्ये पहिली महिला मंत्री होण्याचा बहुमान

मुंबई,२३ जुलै /प्रतिनिधी :- शिंदे सरकार स्थापन होऊन वर्ष उलटलं तरी देखील या सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याने सरकारवर टीका केली जात होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेचा बंडखोर गट सरकारमध्ये सामील झाला. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात मंत्री आदिती तटकरे यांचा देखील समावेश होता. आदिती तटकरे यांना शिंदे सरकारमध्ये पहिली महिला मंत्री होण्याचा मान मिळाला आहे.

अशात राज्याच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात दोन ते तीन महिलांना स्थान मिळावं, असा आग्ररह पक्षाकडे धरला असून पक्षाने देखील ते मान्य केलं असून पुढील मंत्रिमंडळ विस्तारात महिला मंत्री मंत्रीमंडळात दिसतील, असं भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. महिला आघाडीच्या संघटनात्मक कामासाठी चित्रा वाघ कोल्पारूत येथे आल्या होत्या. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, महिलांना पक्षात नेहमीच प्राधान्य दिलं जाईल. आगामी निवडणुकीतही महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील. आजही विधान सभा आणि विधान परिषदेत पक्षाच्या सर्वाधिक महिला आमदार आहे. त्या उत्तम काम करतील, असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या.