औरंगजेबची कबर उखडून समुद्राच्या मध्यभागी फेका – गुणरत्न सदावर्ते

मुंबई ,१८ जून /प्रतिनिधी :-राज्यात सध्या औरंगजेबचे पोस्टर नाचवल्याने तसंच काहींनी व्हाट्स अॅपवर स्टेटस ठेवल्याने तणाव निर्माण झाली होता. कोल्हापूरात तर यामुळे मोठा हिंसाचार उफाळून आला होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुलं वाहिली. यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावर याता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक वक्तव्य केलं आहे. औरंगजेबाची कबर उखडू नका ती कबर समुद्राच्या मध्यभागात फेका असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

याविषयी बोलताना सदावर्ते म्हणाले की, औरंगजेब किंवा अजमल कसाब यांच्यासारखे लोक हे कधीही प्रेरणास्थान असू शकत नाही. औरंगजेबाची कबर फक्त उखडून टाकता कामा नये ती समुद्राच्या मध्यभागी बुडवली पाहिजे. अमेरीकेने ओसामा बिन लादेनचं प्रेत कुठे नेऊन टाकलं? समुद्राच्या मध्यभागी. त्याच पद्धतीने औरंगजेबाची कबर उखडून समुद्राच्या मध्यभागी फेकली पाहिजे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर हे कधीही जातीय राजकारण करत नव्हते. अकोल्यात ते लढले तेव्हा काँग्रेसने कसा उमेदवार दिला याची त्यांना जाणीव असली पाहिजे. त्यांना पाडण्यासाठी काँग्रेसने कायमच अल्पसंख्यांक समुहाचा वापर केला. सोलापूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे आपण पाहिलं की उमेदवारांना कसा त्रास दिला गेला? असंही ते म्हणाले.

यावेळी सदावर्ते यांनी नथुराम गोडसेवरही भाष्य केलं आहे. नथुराम गोडसेंनी देशाचे तुकडे करा असं कधीही म्हटलं नाही. अखंड भारताचा त्यांचा विचार होता. अखंड भारत हा अफगाणिस्तान ते श्रीलंकेपर्यंत आहे. त्यांच म्हणणं काय चुकीचं होतं? महात्मा गांधींचे दोन विचार कधीही मान्य करणार नाही. काँग्रेसने मात्र त्यावेळी घाणेरड राजकारण केलं. असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी बौद्धांचा आणि आरएसएसचा विचार साता समुद्रापार पोहचला आहे असं म्हणत अमेरिकेतही आरएसएसची चर्चा असल्याचं सदावर्ते म्हणाले.