फडणवीस व राज ठाकरेंच्या भेटीने चर्चांना उधाण

मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल (29 मे) रात्री दहा वाजेच्या सुमारास भेट घडली. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या दादर मधील शिवतिर्थावरील निवसास्थानी जाऊन ही भेट घेतली. ही भेट तब्बल सव्वा तास चालली. या दोन्ही बड्या नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. देवेद्र फडणवीस यांनी मात्र ही भेट अराजकीय असल्याचे सांगितले आहे. मात्र मराराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होतंय का काय? याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.
भेट अराजकीय असल्याचे देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तूळात चर्चाना उधाण आलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट अराजकीय असल्याचे सांगत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “काल शिवतिर्थावर अराजकीय गप्पा मारण्यासाठी गेलो होतो. एक दिवस गप्पा मारायला बसू असं बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं आणि काल तो मुहुर्त निघाला. राजकीय सोडून गप्पा करायच्या असं ठरलं होतं. गप्पा या अराजकीय असतात”, असं फडणवीस यांनी या भेटवर स्पष्टीकरण दिलं आहे.

मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते ही बैठक महत्वाची मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर दिलेल्या निकालानंतर भाजप आणि मनसे यांची जवळीक वाढत होती. पण कर्नाटकात भाजपचा झालेल्या पराभवावर राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करत “ज्यांना वाटत आपला कोणीही पराभव करु शकत नाही., त्यांनी या निकालातून धडा घ्यावा”, असं वक्तव्य केलं होतं. यामुळे मनसे भाजपात यावरुन अंतर पडल्याचे दिसून येत होते. त्यानंतर झालेल्या या सव्वा तासांच्या भेटनंतर राजकीय विश्वात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.