पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघातात ११ गाड्यांची एकमेकांना धडक!

खोपोली : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ झालेल्या विचित्र अपघातात तब्बल ११ वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी असल्याचे समजते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रक, स्वीफ्ट आणि अर्टीगा अशी वेगवेगळी सात वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. यानंतर स्थानिकांकडून अपघातातील जखमींना मदत केली जात आहे. या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप समोर आले नाही.या अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.