राऊतांचे आरोप बिनबुडाचे: देवेंद्र फडणवीस

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिस आयुक्तांना लिहलेल्या पत्रात गुंड राजा ठाकूरचा उल्लेख केला आहे. माझ्या जीवाला धोका असल्याची भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली. माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे काढून घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, “सुरक्षेचे विषय हे राजकारणाशी जोडणे हे अतिशय चुक आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करणं हे त्याहीपेक्षा चुक आहे. राउतांच पत्र हे सुरक्षेसाठी की सनसनाटी निर्माण करण्यासाठी? कुणालाही सुरक्षा देण्याचं काम मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करत नाही. त्यासाठी वेगळी समिती असते. मात्र, राउतांना आता प्रसिद्धीची सवय लागली आहे. पहिलं त्यांच्या आरोपाला उत्तर तरी आम्ही द्यायचो. पण, आता बिनडोक आरोप ते करतात.” असा टोला फडणवीस यांनी लगावला.