महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर

मुंबई ,२४ डिसेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डी वॉर्ड कार्यक्षेत्रात ताडदेव, महापालिका शाळा, बने कम्पाउंड, साने गुरूजी  येथे आज बालकांसाठी मोफत लसीकरण आणि वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरामध्ये बालकांची दंत तपासणी आणि उपचार तसेच वैद्कीय तपासण्या करण्यात आल्या. या शिबीरासाठी मोठ्या प्रमाणत बालके उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा उपस्थित होत्या.