शेवटच्या चेंडूवर षटकार मारत शेतकरी इलेव्हन संघ ठरला विजेता

तलवाडा येथे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा

वैजापूर,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त 10 डिसेंबर पासून  वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे सुरुवात झालेल्या  स्पर्धेत अंतिम सामन्यात शेतकरी इलेव्हन या संघाने अखेर बाजी मारली. गुरुवारी ((ता.15) मान्यवरांच्या उपस्थितीत काकाश्री संघ आणि शेतकरी इलेव्हन संघात अंतिम सामना झाला.  या सामन्यात काकाश्री संघाने प्रथम फलंदाजी करतांना चार षटकांच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना 48 धावा करून 49 धावांचे लक्ष शेतकरी इलेव्हन या संघाला दिले होते. हे लक्ष शेतकरी इलेव्हन संघाने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून लक्ष पुर्ण करत विजय प्राप्त केला. 

या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मुश्रीफ मोमीन या खेळाडूला देण्यात आला. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सरफराज सैय्यद या खेळाडूला देण्यात आला. या स्पर्धेत आठ संघाने सहभाग नोंदविला  होता.त्यामध्ये उपसरपंच वॉरियर्स, भैरवनाथ पार्क,  अरिहंत वॉरियर्स, मोहमदिया सीसी ,काकाश्री ,शेतकरी इलेव्हन ,संघर्ष योद्धा, मामाश्री या आठ संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदविल्याने सामन्याची रंगत वाढत गेली. 

  अंतिम सामन्याच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित होते .तसेच माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ,संजय पाटील निकम ,अविनाश पाटील गलांडे, प्रकाश भाऊ चव्हाण, रिखबचंद पाटणी, भागिनाथ दादा मगर, राजू नाना मगर, सजन दादा शिंदे, उत्तम पाटील निकम, गौतम सोनवणे पैलवान, भिकन सोमासे, संतोष निकम ,अनिल नवले,  सरपंच ज्ञानेश्वर मगर, उपसरपंच दादाभाऊ मगर, माजी सरपंच भाऊसाहेब मगर, शामराव मगर ,आबासाहेब मगर ,ढेकु गावचे सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून सुदाम मोरे व पंकज भाऊ यांनी काम पाहिले. तर सूत्रसंचालन श्रीकांत वैजापूरकर यांनी केले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठीकिशोर पाटील मगर ( तालुका अध्यक्ष छावा संघटन वैजापूर)  तैमुर भाई सैय्यद (पत्रकार लोणी खुर्द)तलवाडा प्रीमियर लीग कमिटी अध्यक्ष आरिफ शेख , योगेश पवार , गब्बू पठाण, किशोर पवार ,जमील पठाण ,बबन वाघचौरे, गणेश बाणेदार, अल्ताफ पठाण ,शफिक शेख, फैयाज शेख, हमीद पठाण, तोसिफ पठाण, डीजे सौजन्य बाबासाहेब पेटारे, मंडप सौजन्य योगेश पवार समस्त गावकरी सरपंच, उपसरपंच लोणी, तलवाडा पत्रकार मंडळी यांचा मोलाचा सहभाग होता.