प्रसिद्ध लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन, वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण (९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज, शनिवार १० डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास मुंबईमधील गिरगावच्या फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.लावणी आणि सुलोचना ताईंचे नाते वेगळे होते. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी लावणी गाऊन प्रेक्षकांमध्ये स्वतःची एक वेगळीच छाप पाडली. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी ३ वाजता मरीन लाइन्स स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 60 वर्षांहून अधिक काळ मराठी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. याशिवाय काही शस्त्रक्रिया आणि वाढत्या आजारामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

१३ मार्च १९३३ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या.