भारतात एका दिवसात 8.3 लाखांहून अधिक विक्रमी संख्येने चाचण्या

भारतात एका दिवसात 56,383 रुग्ण बरे होण्याचा विक्रम
2.68 कोटींहून अधिक नमुने तपासले

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020

एकाच दिवसात  8 लाखाहून अधिक चाचण्याचा महत्वाचा टप्पा पार करत भारताने गेल्या 24 तासांत 8,30,391 इतक्या विक्रमी संख्येने चाचण्या केल्या. टेस्ट, ट्रॅक , ट्रीट  रणनीतीचा अवलंब करत दररोज 10 लाख चाचण्या करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.

कोविड -19 बाधित रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यासाठी  पहिली महत्त्वाची पायरी म्हणून आक्रमक चाचण्या करण्याच्या केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या  संकल्प आणि दृढनिश्चयामुळे भारत दररोज घेतल्या जाणार्‍या चाचण्यांची संख्या वेगाने  वाढवत आहे. जुलै 2020 च्या पहिल्या आठवड्यात सुमारे 2.3 लाख  इतके साप्ताहिक सरासरी दैनंदिन चाचण्याचे प्रमाण हिते, ते वाढून चालू आठवड्यात  6.3 लाखांहून अधिक झाले आहे.

गेल्या 24  तासांत  8 लाखाहून अधिक इतक्या विक्रमी चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण 2,68,45,688 कोटी  चाचण्या करण्यात आल्या  आहेत. प्रति दहा लाख लोकांमध्ये चाचणीचे प्रमाण वाढून 19453 इतके झाले आहे.

देशभरात चाचणी प्रयोगशाळांचा सातत्याने  विस्तार झाल्यामुळे हे शक्य झाले आहे. जानेवारी 2020 मध्ये देशात केवळ एक प्रयोगशाळा होती, तर आज देशात   1433 प्रयोगशाळा असून सरकारी क्षेत्रात  947 आणि खासगी 486 प्रयोगशाळा आहेत. केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या समन्वित प्रयत्नाचा हा परिणाम आहे.

विविध प्रकारच्या प्रयोगशाळा पुढीलप्रमाणे –

  • रिअल- टाईम आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळा: 733 (शासकीय:434  + खासगी: 299)
  • ट्रूनॅट आधारीत प्रयोगशाळा: 583 (शासकीय: 480 + खासगी: 103)
  • सीबीएनएएटी आधारीत प्रयोगशाळा: 117 (शासकीय: 33  + खासगी: 84 )
बरे झालेल्या रुग्णांचा आकडा जवळपास 17 लाख

भारतात एका दिवसात सर्वाधिक 56,383 रुग्ण बरे होण्याच्या आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. या आकड्यासह, कोविड-19 च्या बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आज जवळपास 17 लाखावर (16,95,982) पोहोचला आहे.

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या एकत्रित, केंद्रित आणि सहयोगी प्रयत्नांसह लाखो आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यामुळे, केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार स्टँडर्ड ऑफ केअरच्या माध्यमातून गंभीर स्वरूपाच्या रुग्णांचे प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन, गृह अलगीकरण यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून चाचणी करणे, पाठपुरावा करणे आणि प्रभावी उपचारांची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सतत होणाऱ्या वृद्धीमुळे रुग्ण बरे होण्याच्या दराने 70 % चा टप्पा पार केला आहे, कोविड-19 रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन मृत्यू दर 1.96% वर आला आहे आणि यात सतत घसरण होत आहे.

रुग्ण बरे होण्याच्या विक्रमी नोंदीमुळे हे सुनिश्चित झाले आहे की देशातील कोविडच्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे आणि सध्या देशात एकूण रुग्णांपैकी 27.27 % सक्रीय  कोविड-रुग्ण आहेत. सक्रीय रुग्णांपेक्षा (6,53,622) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *