नांदेड जिल्ह्यात 168 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू

नांदेड दि. 6 :- जिल्ह्यात आज 6 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 83 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 168 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 521 अहवालापैकी 316 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 2 हजार 860 एवढी झाली असून यातील 1 हजार 215 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 523 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 65बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

बुधवार 5 ऑगस्ट रोजी गोकूळनगर नांदेड येथील 64 वर्षाची एक पुरुष, देगलूर येथील 70 वर्षाचा एक पुरुष, चिखलवाडी नांदेड येथील 74 वर्षाचा एक पुरुष, दापका राजा मुखेड येथील 80 वर्षाची एक महिला, मुखेड येथील 74 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथे तर मकबुलनगर नांदेड येथील 65 वर्षाची एक महिला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 109 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 83 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 1, कंधार कोविड केअर सेंटर येथील 7, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 15, भोकर कोविड सेंटर येथील 1, खाजगी रुग्णालय 29, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 10, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील 3, नांदेड पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 14, बिलोली कोविड सेंटर येथील 02, औरंगाबाद येथील संदर्भित 1 असे एकूण 83 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 55, बिलोली तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 1, अर्धापूर तालुक्यात 6, देगलूर तालुक्यात 8, कंधार तालुक्यात 1, माहूर तालुक्यात 1 असे 75 बाधित आढळले.जिल्ह्यात 1 हजार 523 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 689,घेतलेले स्वॅब- 19 हजार 459,निगेटिव्ह स्वॅब- 14 हजार 780,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 168,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 860,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 10,मृत्यू संख्या- 109,रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 215,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 523,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 635. आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 65

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *