स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

लातूर, १५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपलं सर्वस्व त्यागून बलिदान दिलं. काहींनी संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं. त्या सर्व ज्ञात, अज्ञात वीरांचे स्मरण करून त्यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अभिवादन केलं. येत्या 17 सप्टेंबर पासून हैदराबाद मुक्ती लढ्याचा अमृत महोत्सव सुरु होतो आहे. तोही मोठ्या उत्साहात आपल्याला जिल्ह्यात साजरा करु, अशी भावना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी व्यक्त केली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

Image


देशीकेंद्र माध्यविद्यालय, लातूर कु. कलकोटे अथर्व नामदेव, कु. कनगुले प्रदयुम्न बालाजी, कु. स्वामी रुतूजा महेश, कु. काळे निरंजन विनोद, केशवराज माध्यमिक विद्यालय,लातूर कु. शिरुरे इश्वरी दयानंद, कु. चव्हाण पियुश गोकूळ, कु. धुमाळ ओमकार बालाजी, पाटील भरत राजपाल, विद्याविकास माध्यमिक विद्यालय, लातूर कु. गायकवाड अजिंक्य रोहिदास, स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कुल लातूर कु. कदम रोहन दशरथ, बसवनप्पा वाले न्यु इंग्लिश मि. स्कुल, लातूर कु. कुलकर्णी वरुण व्यंकटेश, ज्ञानप्रकाश बालविकास विद्यालय लातूर कु. शारखाने शुभम सतिश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा निवड परिक्षेत यशस्वी झालेल्या 14 विद्यार्थ्यांचा एकाचवेळी सत्कार करण्यात आला.

Image


जिल्हास्तरीय लघुद्योजक पुरस्कार
मे. गुडवील पॉली प्लास्ट अतिरिक्त उद्योजक सुनिलकुमार उपाध्याय यांना रुपये 15 हजार चा धनादेश गौरव चिन्ह, शाल व श्रीफळ , मे. प्रिया इंडस्ट्रिज एम.आय.डी.सी. लातूर येथील सौ. प्रतिभा प्रमोद अंदूरकर रुपये 10 हजार चा धनादेश गौरव चिन्ह, शाल व श्रीफळ यांना जिल्हा उद्योग केंद्र लातूर कार्यालयामार्फत वित्तीय वर्षे सन 2019-20 जिल्हास्तरीय लघुद्योजक पुरस्कार वितरण करण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत विलासराव देशमुख शासकीय रुग्णालय व महाविद्यालय, विवेकानंद हॉस्पिटलअंतर्गत विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन ॲन्ड रिसर्च सेंटर लातूर यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
गंगाधर बाजीराव सोमवंशी यांनी तुळजापूर ते लातूर आझादी दौड 75 किलोमीटर दौड पूर्ण केल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
आदर्श तलाठी,उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव

Image


रेणापूर तालुक्यातील तलाठी सज्जा- रेणापूर येथील गोविंद शिवाजीराव शिंगडे यांना सन 2021-2022 आदर्श तलाठी पुरस्कार प्रशस्तीपत्र व रोख रक्कम रुपये 5 हजार, उदगीर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, निलंगा तहसील कार्यालयातील येथील नायब तहसीलदार अरुण महापुरे व चाकूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बालाजी चितळे यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून तर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून डी. एम. माळी, लातूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून डी. आर. सुर्यवंशी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

पात्र असलेल्या रास्त भाव दुकानदारांचा सत्कार
श्रुती महिला बचत गट सौ. शुभांगी पद्माकर साखरे दुकान क्रमांक 30, पंचशिला महिला बचत गट सौ. रत्नमाला दिलीप घोडके रास्त भाव दुकानदार म्हाडा कॉलनी, सादीकअली उस्मानसाब शेख दुकान क्रमांक 34, विश्वनाथ गुलाबराव माने दुकान क्रमांक 36, सौ. सुशिलादेवी लक्ष्मण माने दुकान क्रमांक 94 या 05 लातूर शहरातील आय.एस.ओ. नामांकनासाठी पात्र असलेल्या रास्त भाव दुकानदारांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते वीरमाता / वीरपत्नी यांचाही गौरव करण्यात आला.

Image


यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूबिंय, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, पत्रकार यांची भेट घेवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

चित्रप्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी मोठया प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झाले. त्यात अनेकांना आपले जीवनही गमवावे लागले. अनेकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्याच्या झळा पुढे अनेक वर्ष बसत राहिल्या. त्याच्या स्मृती आणि त्यांच्या प्रती असलेली सहवेदना आपल्या स्मरणात राहव्यात म्हणून देशभर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. लातूरच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात या “विभाजन विभाषिका स्मृती दिवस चित्र प्रदर्शनाचे ” उदघाटन दिनांक 14 ऑगस्ट, 2022 रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात त्याकाळातले दुर्मिळ फोटो, त्यात गर्दीने भरलेल्या रेल्वे, त्या काळातील या हिंसाचाराचे दैनिकात आलेल्या बातम्या हे सगळे आहेत. आपल्या पूर्वजांनी हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किती मोठी किंमत मोजली आहे हे प्रदर्शन पाहुन आपल्याला कळेल.. आणि आजच्या स्वातंत्र्याचे मोलही कळेल त्यामुळे आज दि. 15 व 16 ऑगस्ट, 2022 असे दोन दिवस अधिकाधिक नागरिकांनी हे प्रदर्शन पाहावे असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.