भाजपा प्रदेश सचिवपदी अरविंद पाटील निलंगेकर

निलंगा,२२जून/प्रतिनिधी :- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश सचिव पदी अरविंद पाटील निलंगेकर यांची नियुक्ती करून सदर निवडीचे पत्र दिलेले आहे.प्रदेश सचिवपदी नियुक्ती करताना अरविंद पाटील निलंगेकर यांच्या संघटन कौशल्याचा विचार करून त्यांच्याकडे राज्यातील शक्ती केद्र व बुध रचनेची विशेष जवाबदारी देण्यात आलेली आहे.या निवडीबद्दल अरविंद पाटील निलंगेकर यांचे लातूर जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदन होत आहे.
लातूर जिल्ह्याचे युवा नेता असलेले अरविंद पाटील निलंगेकर हे गत 20 वर्षापासून एकनिष्ठेने भाजपात कार्यरत असून पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत.जिल्ह्यतील ग्रामपंचायत,स्थानिक स्वराज्य संस्था यासह विधानसभा व लोकसभा निवडणूकीदरम्यान पक्षाला विजयश्री मिळवून देण्यासाठी बूथ पातळीवर कार्य करून  त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. निवडणूका असो की पक्षाचा कोणाताही कार्यक्रम असो अरविंद पाटील निलंगेकर यांचे नियोजन म्हणजे तो कार्यक्रम यशस्वीच होणार असे सूत्रच ठरून गेलेले आहे.2019 लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तातक्लीन  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सद्याचे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये घेण्यात आलेल्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्याच्या नियोजनाचे कौतुक संपूर्ण राज्यभरात झालेले होते.गत 20 वर्षापासून भाजपाचे संघटन वाढवण्यासह पक्षाची विचारधारा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्यासाठी अरविंद पाटील निलंगेकर यांनी मोठे योगदान दिले आहे.
अरविंद पाटील निलंगेकर यांच्या या कार्याची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना प्रदेश सचिव म्हणून नियुक्त केले आहे.सदर नियुक्तीचे पत्र देताना अरविंद पाटील निलंगेकर यांच्याकडे महाराष्ट्रातील शक्तीकेंद्र व बुथ रचनेची विशेष जवाबदारी देण्यात आली आहे.या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह पक्षश्रेष्ठीचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी आभार व्यक्त करत पक्षश्रेष्ठीनी आपल्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो सार्थक ठरवत महाराष्ट्रात सशक्त शक्तीकेंद्र व समर्थ बुथ ही संकल्पना राबविण्यासाठी पूर्णपणे योगदान देत त्यासाठी परिश्रम घेत पक्षक्षेेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया दिली आहे.अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे लातूर जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदन होत आहें.