बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

मुंबई,२६ मे /प्रतिनिधी :- डीएचएफएल प्रकरणात तीनशे कोटीपेक्षा जास्तची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता. ईडीनं यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. सीबीआयनं गेल्या काही दिवासांपूर्वी भोसले यांच्या घरी छापे टाकले होते. अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर सीबीआय नेमकी काय कारवाई करणार येणाऱ्या काळात समोर येईल. ईडीनं गेल्यावर्षी अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त केली होती. डीएचएफएल प्रकरणात सीबीआयकडून त्यांचा शोध घेण्यात आला होता.

अविनाश भोसले यांच्यावर ईडीनं गेल्यावर्षी कारवाई केली होती. अविनाश भोसले यांची ४० कोटींची संपत्ती गेल्यावर्षी जूनमध्ये जप्त करण्यात आली होती. अविनाश भोसले यांच्या व्यावसायिक भागीदारांवर देखील छापे टाकण्यात आले होते. डीएचएफल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयनं ही कारवाई केली आहे. सीबीआयनं अटकेची कारवाई करण्यापूर्वी ३० एप्रिल रोजी छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. अविनाश भोसले यांचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार यांच्यावर देखील सीबीआयनं छापे टाकले होते. मुंबईतील मालाडमध्ये सीबीआयनं छापे टाकले होते, अशी माहिती आहे. सीबीआयनं ३० एप्रिलला ८ ठिकाणी छापे टाकले होते. अविनाश भोसले हे एबीआयल ग्रुपचे मालक आहेत.

अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसंच व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं. गेल्या काही काळापासून ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.