शेतात लावलेले तीन चंदनाचे झाडे चोरुन नेणाऱ्या दोघांना अटक

औरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी :-शेतात लावलेले तीन चंदनाचे झाडे चोरुन नेणाऱ्या दोघांना छावणी पोलिसांनी शुक्रवारी दि.२२ दुपारी अटक केली. फारुख नवाज पठाण (२७) आणि रफीक गुलाम रसुल पठाण (दोघे रा. कुंजखेडा ता. कन्नड) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस  कोठडीत ठेवण्‍याचे आदेाश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पी.एस. मुळे यांनी दिले.

या प्रकरणात समर्थनगरात राहणारे संतोष पराजी लोखंडे (४१) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीचे भावसिंगपुर्यात गट क्रं.४८ येथे शेत आहे. शेतात तीन चंदनाची झाडे लावलेली होती. १० जुलै रोजी फिर्यादी हे शेतात गेले असता चंदनाची तीनही झाडे चोरट्यांनी चोरुन नेल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. या प्रकरणात छावणी पोलिस  ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी आरोपींनी चोरलेली चंदनाची झाडे हस्‍तगत करायची आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार होते काय याचा देखील तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.