पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा

मुंबई ,१६ मार्च /प्रतिनिधी :- पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि  नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया, असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

होळीमध्ये वाईट विचार आणि कृतीचे दहन केले जाऊन सुविचारांची पेरणी केली जाते. हीच परंपरा आपण विविध स्वरूपात पुढे नेत असतो. २१ मार्च हा दिवस आपण जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो. आपण ज्याला वातावरणीय बदलाचे परिणाम म्हणतो आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर भाष्य करतो तेव्हा त्याची सगळी उत्तरे आपल्याला “वनात” मिळतात. आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेव्हा आपण होलिका दहनाचा विचार करतो तेव्हा त्यासाठी वृक्षतोड होणार नाही, निसर्गरंगांची जपणूक होईल, याची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

आपण झाडं लावा, झाडं जगवा असा संदेश देतो. हा संदेश खऱ्याअर्थाने प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्यासाठी ठोस कृती करण्यासाठी होळीसारखा दुसरा सण असूच शकत नाही. आता दृष्टीआड सृष्टी असं न म्हणता, जागरूकदृष्टीने या “सृष्टी”कडे  लक्ष देण्याची वेळ आली आहे. असेही मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात.

दुर्बल, वंचित बांधवांना आनंदात सहभागी करुन घ्या, वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

समाजातील दुष्प्रवृत्तींचं होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे…

“समाजातील दुष्प्रवृत्तींचं होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीचा सण साजरा करताना समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांनाही आपल्या आनंदात सहभागी करुन घ्या. वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्राच्या गावखेड्यात, विशेषत: कोकणात साजरा होणारा होळीचा सण यंदाही आनंदात, उत्साहात साजरा होऊ दे. समाजातील अज्ञान, अस्वच्छता, अनिष्ठ रुढी, परंपरांचा विनाश होऊ दे. राज्यातल्या घराघरात, मनामनात ज्ञानाचा प्रकाश उजळू दे. होळी व धुलीवंदन साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळावा, नैसर्गिक रंगाचा वापर करावा. डोळे व त्वचेला इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन सुरक्षित होळी साजरी करा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.