कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही सर्वात कमी असणाऱ्या देशांमध्ये भारताची गणना -आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

नवी दिल्ली, 14 जुलै 2020

  • भारतातकोविड-19 च्या रुग्णांचे प्रति दशलक्ष प्रमाण हे जगातल्यासर्वात कमी प्रमाण असलेल्या देशापैकी एक आहे.काही देशातील हे आकडे भारतातील आकड्यांपेक्षा 7 – 14 पट अधिक आहेत
  • दर दशलक्ष लोकसंख्येमागेकोविड-19  मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही सर्वात कमी असणाऱ्या देशांमध्ये भारताची गणना होते. काही देशांत हे प्रमाण भारताच्या 35 पट आहे.
  • जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनहीकोविड-19 च्या रुग्णांच्या वाढीचा दर सातत्याने कमी होतो आहे.आपण जर निव्वळ संख्येकडे लक्ष दिलंतर आपल्या धोरणावरचे लक्ष्य झाकोळले जाऊ शकते.भारतात पूर्णपणेकोविड-19 मुक्त झालेल्यांची संख्याउपचार घेत असलेल्यांच्या संख्येच्या अंदाजे 1.8 पट आहेअनेक राज्यांमध्ये रुग्णालयातून घरी पाठवल्या जाणाऱ्यांची रोजची संख्या रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्यांच्या रोजच्या संख्येपेक्षा अधिक असते
  • कोविड-19 च्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 86% रुग्ण केवळ दहा राज्यांत आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी 50% रुग्ण केवळ दोन राज्यांत आहेत.कोविड-19 चे संक्रमण देशभर एकसमानतेने सुरु नाहीयाचेच हे निदर्शक आहे.
  • मे-2020 अखेरपर्यंतकोविड-19 वर उपचार घेत असलेल्यांची संख्या कोरोनामुक्त व्यक्तींच्या संख्येपेक्षा अधिक असे. त्यानंतर मात्रकोरोनामुक्त झालेल्यांची संख्याउपचार घेत असलेल्यांपेक्षा जास्त झाली आहे. आणि या दोन्हीतील फरकआता वाढत चालला आहे
  • कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर सातत्याने वाढतो आहे.आरोग्य मंत्रालयाची माहिती
  • 20 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुक्तीचा म्हणजेकोविड-19 मधून रोगमुक्त होण्याचा दरराष्ट्रीय स्तरावरील दरापेक्षा अधिक आहे.
  • कोविड-19 च्या RT-PCR चाचण्यांसाठी मार्चच्या मध्यापर्यंत आपल्याकडे 101 प्रयोगशाळा होत्याआज आपल्याकडे 1,206 प्रयोगशाळा आहेत. आणि 280 रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर्स आहेत.यामुळे आपल्या चाचणी क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
  • जागतिक आरोग्य संस्थेने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, (https://apps.who.int/iris/handle/10665/332073…कोविड-19 च्या संशयित रुग्णांचे सर्वसमावेशक सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.  दररोज प्रति दहा लाख लोकसंख्येपैकी 140 जणांची चाचणी म्हणजे सर्वसमावेशक’ असे जागतिक आरोग्य संस्था म्हणते
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार, 22 राज्ये दररोज दर दशलक्ष लोकसंख्येमागे 140 पेक्षा अधिककोविड-19 तपासण्या करत आहेत.जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकार राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांनादेत आहे.
  • प्रतिबंधक उपायचाचण्या आणि वैद्यकीय व्यवस्थापन यावर भर देणे पुढेही सुरु असले पाहिजे.कोविड-19 विरुध्दच्या लढ्यात समुदायांनी जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
  • जगभर पुरवल्या जाणाऱ्या लसींपैकी 60% लसी भारतात तयार होतात. भारत याबाबतीत नेतृत्व करत असूनजगभरात लसींच्या दृष्टीने भारत एक अतिशय महत्त्वाचा पुरवठादार आहे. – महासंचालकICMR
  • कोविड-19 साठी प्रतिबंधात्मक लस कोणत्याही देशात विकसित अथवा निर्मित झालीतरीही त्या लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारत किंवा चीन मध्येच होऊ शकेल.प्रत्येक देशजो लसीवर संशोधन करतो आहेतो भारताच्या संपर्कात आहे. कारण भारत लसींचा मोठा उत्पादक देश आहे.- DG,ICMR
  • देशी बनावटीच्या दोन भारतीय संभाव्य लसींचेउंदीर आणि सशांवर केलेले विषारीपणाच्या अभ्यासासाठीचे प्रयोग यशस्वी झाले असूनत्याबद्दलची माहिती DCGI ना देण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलात्यांच्या मानवी प्रयोगांसाठी परवानगी मिळाली आहे-ICMR
  • भारतीय बनावटीच्या दोन्ही लसींच्या मानवी चाचण्यांसाठी सुमारे 1,000 स्वयंसेवक पुढे आले आहेत.यासाठीचे चिकित्सापूर्व प्रयोग तसेच इतर लसींचे प्रयोग आता NIV,पुणे येथे होत आहेत.
  • कोविड-19 लसीचा जलद विकास करणेही नैतिक जबाबदारी आहे.रशिया आणि चीनने ही प्रक्रिया वेगाने सुरू केली आहेअमेरिका आणि इंग्लंडहीलसविकास कार्यक्रमाला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत.भारतही देशी बनावटीच्या दोन संभाव्य लसींवर जलदगतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे
  • कोविड-19 चा राष्ट्रीय सरासरी मृत्यूदर 2.6% आहे. हा दर सातत्याने कमी होत असून जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत हा दर बराच कमी आहे. प्रत्येक आठवड्यात AIIMS चे डॉक्टर्स अतिदक्षता विभागातल्या डॉक्टरांना गंभीर स्वरूपाच्या कोविड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत – आरोग्य मंत्रालय
  • कोविड-19 मधून रोगमुक्त झालेल्या रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दलउपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून माहिती गोळा करण्यासाठी, आरोग्य मंत्रालयाने  सल्लामसलतीचे काम सुरू केले आहे. याच्या आधारे आम्ही भविष्यात काही मार्गदर्शक सूचना देऊ शकतो. – आरोग्य मंत्रालय
  • कोविड-19 चा संसर्ग तुषारांद्वारे होतोहे आता सिद्ध झाले आहे. मात्र,काही सूक्ष्म तुषारांद्वारे हवेतूनही या विषाणूचा प्रसार होऊ शकण्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.  यातून जे  स्पष्ट आहे ते असे की शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर  सुरुच ठेवायचा असून हे अत्यंत महत्वाचे आहे. – DG, ICMR
  • दक्षता कमी झाल्याबरोबर कोरोनारुग्णांचे प्रमाण वाढल्याचे अनेक जिल्ह्यांत व अनेक भागांत आढळून आले आहे. म्हणूनच जेथे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्या भागात क्षेत्रबंदी आणि नियंत्रणाचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.

इतर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *