तिसऱ्या लाटेचे संकेत…१२ राज्यांमध्ये सुरू झाली वाढ

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली, २० सप्टेंबर /प्रतिनिधी :- देशात कोरोनाची आकडेवारी कमीजास्त होत आहे. सध्या देशभरात सणासुदीचे दिवस सुरू आहे. बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र पुन्हा धडकी भरवणारी माहिती पुढे येत आहे. देशात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून १२ जिल्ह्यांनी पुन्हा टेन्शन वाढविले आहे. १२ राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत. सुमारे डझन राज्यांमध्ये, कोरोनाची दैनंदिन प्रकरणे एक हजाराच्या वर येत आहेत. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ हे तिसऱ्या लाटेचे लक्षण असल्याचे तज्ज्ञ सांगत आहे.

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मिझोरामसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा वेग वाढत आहे. केरळ अजूनही कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. राज्यात दररोज २० हजारांहून अधिक नवीन संक्रमित रुग्ण बाहेर येत आहेत. तज्ज्ञांनी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तिसरी लाट येण्याचा अंदाजही व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत येत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची ३०,७७३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर ३०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ३८,९४५ संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३.३२ लाख असून एकूण संक्रमित लोकांची संख्या ३.३४ कोटी आहे. एकूण ३.२६ लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. मृत्यू आतापर्यंत ४,४४ लाख झाले असून एकूण कोरोना लस – ८०.४३ कोटी देण्यात आल्या आहे.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही

जालना : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (Corona Third Wave) संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. मात्र, सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. (There is no indication of a third wave of corona in the state)

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवणार

राज्यात सध्या दररोज 13 ते 14 लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे. त्यामुळे नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं असंही टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यात दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यात रुग्णसंख्येत चढउतार

राज्यात कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत चढ-उतार पाहिला मिळत आहेत. रविवारी राज्यात 3 हाजर 413 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर 8 हजार 326 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97.16 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात सध्या 11 हजार 720 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.