चार हजार कोटींच्या गॅस पाईपलाईन योजनेचा बुधवारी औरंगाबादेत शुभारंभ

औरंगाबादेतील 10 लाख लोकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठाकेंद्रीय मंत्री भागवत कराड

औरंगाबाद,१ मार्च / प्रतिनिधी :- औरंगाबादेतील गॅस पाईपलाईन योजनेचा एकूण खर्च ४ हजार कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात २ लाख कुटुंबांना योजनेचा फायदा होईल तर औरंगाबादेतील १० लाख लोकांना विस्तारित योजनेचा फायदा होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.

​औरंगाबाद शहरापासून साधारण ११७ किमी, श्रीगोंदा शहर आहे, याच श्रीगोंद्याच्या परिसरातून गुजरात ते विशाखापट्टणम मोठी गॅस लाईन होती. एक वॉल्व्ह होती. त्या व्हॉल्व्हमधून औरंगाबाद शहरापर्यंत आपण गॅस लाईन आणलेली आहे. २ मार्चला या योजनेचा शुभारंभ करत आहोत, असं भागवत कराड यांनी सांगितलं.
या योजनेच्या माध्यमातून ३३ ते ३५ टक्के स्वस्त गॅस मिळणार आहे. कंटिन्यू सप्लाय असल्याने महिलांना गॅस संपण्याचं टेन्शन राहणार नाही. तसंच सुरक्षितेतच्या बाबतीत महिलांना कोणतंही टेन्शन राहणार नाही. कारण हा नॅचरल गॅस असल्याने तो हवेत विरुन जाईल, अशी माहितीही कराड यांनी दिली.२०२४ ते २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी ग्वाही देखील कराड यांनी दिली.​

मराठवाड्याच्या  राजधानी मध्ये हर घर गॅस या अभियाना अंतर्गत औरंगाबाद शहर व जिल्हामध्ये,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने  भव्य अशी गॅस पाईपलाईन, शहराच्या सर्व भागांमध्ये टाकण्यात येणार आहे, तसेच औरंगाबाद शहरातील औद्योगिकीकरणाला वेग मिळेल उद्योगांना गॅस मिळेल व शहरामध्ये रोजगार निर्मिती होईल या दृष्टिकोनातून शहरामध्ये पीएनजी  हा गॅस शहराच्या सर्व भागातील अंतर्गत वस्त्यांमध्ये गॅस पाईपलाईनचा भव्य शुभारंभ २ मार्च वार बुधवार रोजी सकाळी ११ वाजता  कार्यक्रम मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर करण्यात येणार आहे,  

कार्यक्रमा मध्ये  हरदिप सिंग पुरी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तथा नागरी विकास मंत्री हे  दूर दृश्य प्रणालीद्वारे युक्रेन  देशाच्या शेजारील हंगेरी या देशामधून  सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन गंगा या एअरलिफ्ट अभियानासाठी  मोदी सरकारने प्रमुख चार मंत्र्यांना युक्रेन च्या युद्धभूमीवर व आजूबाजूच्या सर्व परिसरावर मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडवण्यासाठी ,त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी व आपल्या मातृभूमी मध्ये सकुशल,सुखरूप घेऊन येण्यासाठी या चार मंत्र्यांना पाठवण्यात आले, त्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया ,हरदीपसिंग पुरी,किरण रिजिजू,  जनरल व्हि.के. सिंह यांच्यावर सर्व युद्धभूमीवर अडकलेल्या भारतीय नागरिकांना  कुशल भारतात आणण्याची जबाबदारी दिलेली आहे.भारतीय प्रत्येक नागरिकाचे जीवन आणि संरक्षण हे भारत सरकारची जबाबदारी आहे.त्यामुळे मोदी सरकारचे प्रमुख मंत्री मिशन गंगा या अभियानासाठी विदेशामध्ये रवाना झालेले आहेत.त्यामुळे हरदिप सिंह पुरी दूरदर्शन प्रणालीमार्फत या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील.

कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत तसेच आमदार हरिभाऊ नाना बागडे ,आ. अतुल सावे भाजपा प्रदेश सरचिटणीस, आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

शहराच्या नागरिकांना सर्व सुख सुविधा युक्त जीवन जगता यावे.त्या मुळे गॅस उपलब्ध व्हावा, अल्पदरामध्ये गॅस मिळावा या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प,भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व मधील सरकारने च्या नागरीकांसाठी उपलब्ध करून दिला आहे, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरवासीयांनी उपस्थित रहावे असे आवाहन ,बसवराज मंगरुळे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा,  शहराध्यक्ष संजय केनेकर ,प्रवीण घुगे प्रदेश चिटणीस भाजप, बापू घडामोडे भाजपा प्रदेश सरचिटणीस ओबीसी मोर्चा, विजय औताडे जिल्हाध्यक्ष  ग्रामीण, जिल्हा सरचिटणीस राजेश मेहता ,राजू शिंदे , समीर राजूरकर ,शिवाजी दांडगे,  लक्ष्मण पाटील औटे, यांनी केले आहे, हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी ,मंडल अध्यक्ष, नगरसेवक या कार्यक्रमासाठी  अहोरात्र मेहनत घेत आहेत.

भव्य सभामंडपाची एरिया 60 हजार स्क्वेअर फिट एवढा आहे, या मध्ये 40 बाय 10 फुट ची एक भव्य एलईडी स्क्रीन असेल ,तसेच आत बसलेल्या सर्व लोकांना व्यवस्थित आवाज यावा, स्टेजवरील सर्व भाषणे दिसावेत या साठी 12 बाय 8 या साईजच्या दहा एलईडी स्क्रीन सभामंडपामध्ये लावण्यात आलेले आहेत , आलेल्या जनतेची  गैरसोय होऊ नये म्हणून , फुड पॉकेट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच मुख्य व्यासपीठ हे 60 फुट बाय 30 फुट  आहे व उंची सहा फूट एवढी  आहे, आवाजाची उच्च क्षमता असणारे स्पीकर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत.