‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत १२ व १३ जानेवारीला होणारी पीएच.डी कोर्सवर्क परीक्षा रद्द

नांदेड,१० जानेवारी / प्रतिनिधी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. कोर्सवर्क हिवाळी २०२१ परीक्षेचे आयोजन यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे १२ व १३ जानेवारी रोजी करण्यात आलेले होते. पण कोव्हीड-१९ आणि ओमिक्रॉन या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या आदेशानुसार सदर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. 

सदर परीक्षेचे पुढील वेळापत्रक अद्याप निश्चीत करण्यात आलेले नाही. सुधारीत वेळापत्रक निश्चीत झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी कळविली आहे.