वैजापूर येथे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक आढावा बैठक

वैजापूर ,१० जानेवारी / प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्ष वैजापूरची संघटनात्मक आढावा बैठक पक्षाचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत संघटनात्मक विषयावर  चर्चा होऊन आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, लक्ष्मणराव औटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पैठणपगारे,जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जगताप, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, अल्पसंख्यांक आघाडीचे नबी पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत भाजपचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव औटे, डॉ.दिनेश परदेशी यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीस भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, अनिल वाणी, डॉ.राजीव डोंगरे, सूर्यकांत सोमवंशी,नगरसेवक दशरथ बनकर, शैलेश चव्हाण, गणेश खैरे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.