हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई:- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर.एन.कूपर सर्वसाधारण रुग्णालयाला एम.एस (ऑर्थोपेडिक्स), एम.एस (ओटो-रिनो-लेनोरालॉजी), एम.डी. (फार्माकोलॉजी), एम.एस (ऑपथॅलमोलॉजी), एम.डी (ॲनेस्थेसिऑलॉजी) हे पाच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत मान्यता देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

या मान्यतेनुसार एम.एस (ऑर्थोपेडिक्स), एम.एस (ओटो-रिनो-लेनोरालॉजी), एम.डी. (फार्माकोलॉजी), एम.एस (ऑपथॅलमोलॉजी), एम.डी (ॲनेस्थेसिऑलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अनुक्रमे 4,3,6,1 आणि 4 प्रवेशक्षमतेची परवानगी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिल्यानंतर शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात या दोन्ही रुग्णालयाला  प्रत्येक शाखेसाठी मंजूर प्रवेशक्षमतेनुसार प्रवेश देता येणार आहे.