राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती

May be an image of 1 person, standing, indoor and text that says 'महाराष्ट्र राज्य महिलाआयोग'

मुंबई ,२१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य  महिला आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती रूपाली निलेश चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  महाराष्ट्र  शासनाच्या राजपत्रात दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधी करिता ही नियुक्ती असेल.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंञी अजितदादा पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील , काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रियाताई सुळे ,अन्न पुरवठा मंञी छगन भुजबळ यांचे मनापासून आभार मानते,या सर्वांनी राज्य महिला आयोगावर काम करण्याची मला संधी दिली असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

May be an image of 8 people, people standing and flower

“आज देशामध्ये महाराष्ट्र हे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय प्रगत असे राज्य आहे. त्यामुळे आपल्या महिलांसाठी काम करताना हे अतिशय जबाबदारीचे व आव्हानात्मक असे पद आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आत्मसन्मानासाठी काम करताना कर्तव्यपूर्वक आणि प्रभावीपणे मी निश्चितच काम करेल. राज्यातील महिलांना महिला आयोगाच्या माध्यमातून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मला आपल्या सर्वांचेच सहकार्य लागेल आणि ते सहकार्य आपण कराल याची खात्री मला आहे”अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी पदभार स्वीकारल्यावर आपले मनोगत व्यक्त केले.

May be an image of 3 people, people standing, people sitting and indoor

“पहिल्याच दिवशी आश्वासनांची स्वप्न दाखवणार नाही कामाच्या माध्यमातून या जबाबदारीला पुर्णपणे न्याय देईल आणि ‘महिला आयोग’ हा महाराष्ट्रातील सर्व वर्गातील सर्व स्त्रियांसाठी ‘आपला आयोग’ वाटावा यासाठी मी पूर्ण निष्ठेने कार्यरत राहील “अशी ग्वाही चाकणकर यांनी दिली.